एका खेळणाऱ्या मुलीला…

खेळायला दिलेली वेळ संपल्यावर सर्व मुलं वर्गात येतात. त्यांची शिक्षिका शिकवायला सुरुवात करते, तेवढ्यात एक विद्यार्थिनी बेंचवरून उठते अन् गोट्या खेळायला लागते. शिक्षिका प्रेमाने एवढा एक इंग्रजीचा खेळ घेऊ व मग तुमच्या मताचे खेळूम्हणते. त्यावर विद्यार्थिनीचं निरागस उत्तरटीचर, मी आतापर्यंत अभ्यास करत होती. आता मला खेळावंसं वाटतंय.शिक्षिका पुन्हा तितक्याच प्रेमाने म्हणते, आतापर्यंत सगळे खेळत होते तेव्हा का नाही खेळलीस?” त्यावर विद्यार्थिनीचं त्याच निरागसपणे उत्तर तेव्हा मला अभ्यास करावा वाटत होता म्हणून मी अभ्यास करत होती. आता मला खेळावं वाटत आहे म्हणून मी खेळते.” यावर शिक्षिका काय करते? मुलं काय करतात? तुम्ही त्या शिक्षिकेच्या जागी असता तर काय केलं असतं?

मुलं आणि त्यांना जीव की प्राण वाटणारे खेळ यांच्या अतूट नात्याविषयी सांगतायत चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका वैशाली गेडाम –

————————————————————–

दुपारची जेवणे आटोपली. मुले आपापल्या खेळात मग्न  झाली. पाऊस सुरू असल्याने मुले वर्गातच विविध खेळ खेळत होती. पुढचे नियोजन मनात ठेवून मीही निवांत  बसले होते. पाऊण तासाने (तीन वाजता) मी मुलांना खेळ आटोपता घेण्यास सांगितला. मुलांनी ऐकल्या न ऐकल्यासारखे केले. मी पुन्हा विनंती केली. कुणी खेळ गुंडाळू लागले तर कुणी तसेच खेळत राहिले. आता आणखी काही ग्रुप आपला खेळ टाकून उठले. तरीही एक – दोन ग्रुप अजून खेळतच  होते. मग मी आवाजात किंचित जरब आणली व खेळ आवरता घेण्यास सांगितले. सोबतच मी त्यांना आठवण करून दिली की, त्यांनी सकाळी ११ ते १२ असा एक तास त्यांच्या मताने खेळत घालवला होता. आता सगळी मुले आपला खेळ टाकून उठली. अर्थात बरीचशी मुले अनिच्छेनेच उठली.

संबंधित लेख:-

शिवराय आणि बालमावळे

कार्यशाळाः- मुलांचे प्रतिसाद

मी पुढील कृतीची सुरुवात करणारच होते नि स्नेहा बेंचवरून उठून खाली आली. तिने गोट्या घेतल्या व लागली खेळायला. मी तिला विनंती करत “एवढा एक इंग्रजीचा खेळ घेऊ व मग तुमच्या मताचे खेळू” असे म्हणाले. ती म्हणाली, “टिचर, मी आतापर्यंत अभ्यास करत होती. आता मला खेळावंसं वाटतंय.”

मी म्हणाले, आतापर्यंत सगळे खेळत होते तेव्हा का नाही खेळलीस?”

“तेव्हा मला अभ्यास करावा वाटत होता म्हणून मी अभ्यास करत होती. आता मला खेळावं वाटत आहे म्हणून मी खेळते.” इति स्नेहा.

मला जरा वैताग आला. प्रेमाने आणि स्वातंत्र्यामुळे मुले जरा जास्तच आगाऊ वागत आहेत असे मला वाटले. मी घरून ठरवून इंग्रजी तासिकेची तयारी करून आले होते. मुलांना काय, त्यांना दिवसभर खेळावंसंच वाटतं. मला मात्र  शिकवावं लागेलच. मी स्नेहाच्या गोट्या उचलून ठेवून दिल्या आणि तिला तिथून उठण्यास बाध्य केलं. स्नेहा खेळ टाकून उठली. अनिच्छेनेच.

मी आता अॅक्टिव्हिटिला सुरवात करणारच, तेवढ्यात ‘ऑर्डर – ऑर्डर’ असा आवाज आला. मी आवाजाच्या दिशेने बघितलं तर, समीक्षा (वर्ग पाचवी) डस्टरने बेंचवर ठोकत ‘ऑर्डर – ऑर्डर’ म्हणत होती. मला मजेदार वाटलं. मी काही बोलणार तेवढ्यात समीक्षाने ऑर्डर दिली, “वैशाली गेडाम को हाजीर किया जाय।”

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 8 Comments

 1. avinaya

  छान.
  खेळ आणि लहान मुले यांच नात आम्ही कधी समजुन घेतलेच नाही.

 2. kakash

  योग्य मार्गदर्शन मिळाले.

 3. pmadhav

  वैशाली ताई,
  खुप खुप कौतुक… अप्रतिम अनुभव आपण मांडलेला आहे… आपले नाव आणि हा प्रसंग नेहमी लक्षात राहील…

 4. वृषाली जितेंद्र मोहिते

  छान आहे लेख.इतक्या सहजपणे मुलं वर्गात वावरत आहेत हेच किती आनंददायी आहे.

 5. Anonymous

  मुलांचा खेळण्याचा अधिकार मान्य करायला लावणारा लेख.खेळण्यातील आनंद वाढला.

 6. pratiksha

  अप्रतिम लेख!! खेळण्यातून ही मुलांची वाढ होतं असते ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.

 7. dabhay

  मैदानी खेळ हे पाहिजेच।

 8. dabhay

  खरंच अप्रतिम।
  असे स्वातंत्र्य असेल तर शालेय शिक्षणापासून मूल अन्याय व आपले हक्क या बाबतीत जागरूक होतील।

Leave a Reply