शब्दांचा नाद असणाऱ्यांचं केवळ समानार्थी शब्दांवर भागत नाही. त्यांना त्या शब्दाचे समाज वापरातले अनेकार्थी पदर हवे असतात. ते पदर जोडणारे संदर्भ हवे असतात. त्या शब्दांशी संबंधित म्हणी आणि वाक्प्रचार यांविषयी त्यांना उत्सुकता असते. मग त्यांच्यात ती म्हण, तो वाक्प्रचार यांच्या मुळाशी असणारी गोष्ट जाणण्याचं कुतूहल निर्माण होतं... अशा या उत्सुकतेच्या – कुतूहलाच्या वाढणाऱ्या साखळीला पूर्णत्वाकडे घेऊन जाणाऱ्या एका ऑनलाईन शब्दकोशाविषयी सांगतोय मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाचा विद्यार्थी प्रणव सलगरकर -
---------------------------------------------------------------------------
संबंधित लेखः-
चला, मराठी ऑनलाइन वाचू या…! (भाग – एक)
मराठी भाषेतील ऑनलाइन माहितीस्रोत – भाग तीन
मागच्या लेखात आपण ‘मराठी बृहद्कोश’ नावाचा ऑनलाईन शब्दकोश उलगडून पाहिला. या भागात आपण अशाच आणखी एका शब्दकोशाचे अंतंरंग जाणून घेणार आहोत. आपल्या मराठीत समृद्ध असे शब्दकोश वाङ्मय आहे. या कागदी स्वरूपातील काही शब्दकोशांचा उल्लेख आपण मागील लेखात केल्याचं तुम्हाला आठवत असेल. त्यातलाच य. रा. दाते, चिं. ग. कर्वे, आबा चांदोरकर, चिं. शं. दातार यांच्या संपादक मंडळाने तयार केलेला आठ खंडातला कागदी स्वरूपातील मूळ कोश म्हण ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .