"भाषांना अंगचं ग्लॅमर नसतं. ती भाषा बोलणारे लोक तिच्यात जितका जीव ओततील तितकी एखादी भाषा फुलून येते. अशा प्रकारच्या जिवंत भाषांमध्ये आदान-प्रदान घडतं, वादविवादही घडतात. या सगळ्यांपासून मैलोगणती दूर असलेला आमचा राजकीय आणि वाङ्मयीन अभिजन वर्ग मातृभाषा हव्यातच पण इंग्रजीही हवीच असं दोन डगरींवर पाय ठेवून असेल तर त्यांना काही सोपे प्रश्न विचारा - एक म्हणजे 'मातृभाषा हवी आहे' असं म्हणण्यासारखं तुम्ही या भाषेला काय दिलंय? आणि दुसरं असं की, इंग्रजीचे गोडवे गाण्यापेक्षा इंग्रजीची ताकद आपल्या भाषेत यावी म्हणून तुम्ही काय करणार आहात? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्या अभिजनांना जड जातील यात शंका नाही. पण आपण त्यांच्यावर विसंबून राहायला नको; कारण भाषेची लढाई आपली आहे." ‘भाषाविचार’ सदरातून इंग्रजी भाषेच्या जागतिक वर्चस्वाबद्दल सांगतायत मंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार –
-------------------------------------------------------------------------------
भारतीय घटनेच्या आठव्या परिशिष्टात एकूण २२ भाषा आहेत. जवळपास तितक्याच भाषांना या यादीत स्थान मिळवायचं आहे. त्यामुळे एखाद्या गर्दीच्या गाडीत शिरल्यानंतर ‘आतले आणि बाहेरचे’ हा वाद जसा निर्माण होतो, तसंच भारतीय भाषांचंही झालं आहे आणि यापुढेही होण्याची शक्यता आहे. भाषा आणि बोली, बोली आणि उपबोली यांच्यातले संघर्ष सतत होत राहतात. त्यांनी काणतंही टोक गाठलं किंवा त्यांना राजकीय परिमाण आल ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
nilambari
5 वर्षांपूर्वीखरच आहे
pvanashri
5 वर्षांपूर्वीअगदी खरे आहे
dabhay
5 वर्षांपूर्वीअप्रतिम।
साधना गोरे
5 वर्षांपूर्वीमुंबईचे
dabhay
5 वर्षांपूर्वीअप्रतिम। लेखक गोवा चे काय?
Rdesai
5 वर्षांपूर्वीखरं आहे !