भाषाविचार – इंग्रजीचं जग आणि व्हर्नाक्युलर लोकांची प्रतिष्ठा (भाग – ४)

“जे जे उत्तम आहे ते ते इंग्रजी भाषेत असेल किंवा जे जे इंग्रजी भाषेत असेल ते ते उत्तम भासेल, अशी दुहेरी अडचण आपण करून दिली आहे आणि घेतली आहे. इंग्रजी प्रसारमाध्यमांचा उर्मटपणा त्यातून आला आहे. फक्त इंग्रजी प्रसारमाध्यमांत दोष आहे असं नाही. आमचा विद्यापीठीय विचारवंतांचा वर्ग देखील त्यात सहभागी आहे. अतिशय सामान्य दर्जाचं लेखन, परिसंवादातील निबंध वाचन इंग्रजीतून केलं जातं. त्याला काही सन्माननीय अपवाद असतीलही, पण ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’च्या नियमांची पूर्तता करण्यासाठी सध्या देशभरात कुत्र्याच्या छत्र्यांसारखे जे परिसंवाद होतात, त्यातल्या नव्वद टक्के कामाचा दर्जा हा सुमार किंवा अतिसुमार आहे… आणि त्यावर खर्च होणारा प्रचंड पैसा हा वैचारिक आणि नैतिक भ्रष्टाचारच आहे असं मला वाटतं. इंग्रजी भाषा हे या भ्रष्टाचाराचं वाहन आहे.” ‘भाषाविचार’ सदरातून इंग्रजी आणि देशी भाषा यांच्या वापरातून येणारी प्रतिष्ठा – अप्रतिष्ठा याबद्दल सांगतायत मंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार –

——————————————–

भालचंद्र नेमाडेंना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळाला तेव्हा गूगलवर जगणाऱ्या पत्रकारांना नेमाडे, कोसला, हिंदू यांचा शोध घेत बसावं लागलं. ‘इंग्रजी शाळा काढून तिथे मुताऱ्या बांधल्या पाहिजेत’ असं विधान नेमाडेंनी केल्यामुळे हा कुणी तरी सणकी म्हातारा असणार, असं त्यांचं नेमाडेंबद्दल मत झालंच असेल. त्यातच नेमाडेंनी नायपॉल, रश्दी ह्या इंग्रजीच्या जगातल्या दैवतांवर हल्ला केल्यामुळे ते अगदीच पाखंडी ठरले. नेमाडेंच्या सुदैवाने सलमान रश्दींनी त्यांच्यावर असभ्य भाषेत टीका केली. त्यामुळे इंग्रजी प्रसारमाध्यमांना नाईलाजाने नेमाडेंची दखल घ्यावी लागली. अन्यथा मराठीसारख्या किरकोळ भाषेत लिहिणाऱ्या माणसाची दखल घेणं, हे इंग्रजीच्या घोड्यावर स्वार झालेल्या लोकांसाठी पापच म्हटलं पाहिजे.

मागील लेखः-

भाषाविचार – तुमची मुलं कोणत्या शाळेत जातात? (भाग – ३)

भाषाविचार – भाषाभगिनी, भांडणभाऊ आणि इंग्रजीचा बोका (भाग – २)

 इंग्रजी प्रसारमाध्यमांत काम करणारे लोक प्राधान्याने भारताच्या काही भागांमधून आले आहेत. दाक्षिणात्यांचा आणि बंगाल्यांचा त्यात मोठा भरणा आहे. इतरांना तटस्थस्ता आणि नि:पक्षपाती

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 3 Comments

 1. dsudhir

  समाजातील कटू वास्तव आपण अतिशय मार्मिक पणे मांडले आहे.
  इंग्रजी माध्यमाचे अंधानुकरण टाळायला हवे..
  सुधीर दाणी

 2. chanibhamare

  छान लेख

 3. sdipti

  इंग्रजी भाषा म्हणजेच सर्व काही आहे आणि त्यातीलच ज्ञान श्रेष्ठ आहे, असं मानणाऱ्या लोकांच्या डोळ्यांत अंजन घालणारा महत्त्वाचा लेख आहे हा.

Leave a Reply