भाषाविचार – तुमची मुलं कोणत्या शाळेत जातात? (भाग – ३)

‘लोकांनी आपल्या मुलांना मातृभाषेतलं शिक्षण द्यावं’ असा आग्रह धरण्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण द्यावं लागतं. त्यातून पळवाट काढण्यासाठी घराजवळ शाळा नव्हती, झोपडपट्टीतली मुलं त्या शाळांमध्ये येतात, मित्रांची, नातेवाईकांची मुलं इंग्रजी माध्यमातच जातात, बायको किंवा नवरा ऐकत नाही अशी वेगवेगळी कारणं शोधली जातात. अनेकदा असं दिसतं की, आपल्या मुलांना मातृभाषेतून न शिकवण्याचा निर्णय झालेला आहे आणि तो स्वतःला व इतरांना पटवून देण्यासाठी कारणांची जंत्री तयार केली जाते. प्रादेशिक भाषांमधून शिकवणारे शिक्षक, अशा संस्थांचे संस्थाचालक आणि विश्वस्त अनेकदा आपल्या शाळांमधून मुलं कमी होत असल्याची ओरड करतात. मात्र अशा वेळेला आपली मुलं या शाळांमधून का शिकत नाहीत असा प्रश्न त्यांना पडत नाही. आपल्या शिक्षण व्यवस्थेतले अनेक घटक मातृभाषेतल्या शिक्षणाच्या बाबतीत एका सामूहिक दांभिकपणाचा भाग झाले आहेत. हा दांभिकपणा संपल्याशिवाय मातृभाषेतल्या शिक्षणाचं काहीही बरं होऊ शकणार नाही.

‘भाषाविचार’ सदरातून मातृभाषा आणि शाळेच्या माध्यमाबद्दल सांगतायत मंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार –

———————————————————

हेही वाचा :-

भाषाविचार- भाषेची वसाहत आणि वाताहत (भाग-१)

भाषाविचार – भाषाभगिनी, भांडणभाऊ आणि इंग्रजीचा बोका (भाग – २)

प्रादेशिक भाषांचा वापर वाढवावा, त्यातून गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावं असा आग्रह कुणी धरायला लागलं, की त्यांना विचारला जाणारा पहिला प्रश्न म्हणजे ‘तुमची मुलं कोणत्या शाळेत जातात?’ जर तुमची मुलं भारतीय भाषांमधून शिकत नसतील तर तुम्हांला लोकांना त्याबद्दल सल्ला देण्याचा काय अधिकार आहे, असा या प्रश्नाचा अर्थ आहे. बव्हंशी ते बरोबरही आहे. मात्र त्यामुळे आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात पाठवणाऱ्या, पण तरीही आपल्या मातृभाषेसाठी काहीतरी करू इच्छिणाऱ्या लोकांनी काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे.

असा प्रश्न लोकांना पडायला आणि त्यांनी तो विचारायला साधारणपणे दोन-तीन दशकं उलटून गेली आहेत. सार्वजनिक व्यासपीठांवरून आपल्या भाषांबाबत आग्रही राहणाऱ्या लोकांनी

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 4 Comments

 1. bookworm

  अतिशय समतोल व शेवटचा परिच्छेद योग्य दिशा देणारा आहे.

 2. maviraj

  डोळ्यात अंजन घालणारा लेख आहे.

 3. dabhay

  माहितीपर लेख
  फार छान

 4. nilambari

  अगदी बरोबर लिहीलयं.

Leave a Reply