शालेय अभ्यासक्रम आदर्शवत करण्यासाठी…

महात्मा गांधी, विनोबा भावे यांनी मूलगामी (बुनियादी) शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला. त्यामध्ये शिक्षणाची समाजोपयोगिता केंद्रस्थानी मानली गेली. मात्र आपण सध्या राबवत असलेल्या अभ्यासक्रमातून अशी समाजोपयोगिता आजवर सिद्ध होऊ शकलेली नाही. या पार्श्वभूमीवर भूगोलाचे प्राध्यापक विद्याधर अमृते यांनी आपल्या अभ्यासक्रम निर्मितीचा घेतलेला हा आढावा –

“प्रत्येक पारंपरिक विषयांमधील कोणते घटक त्या त्या उत्पादित कार्यासाठी उपयोगी आहेत हे लक्षात घेऊन प्रत्येक विषयाचे महत्त्व ठरवावे. ते कार्याप्रमाणे बदलेल व कमी जास्त होऊ शकेल. म्हणजेच घरबांधणीचे उत्पादित व श्रमाचे काम करताना भूमितीमधील कोणते घटक उपयोगी आहेत (उदा. काटकोन वगैरे) ते लक्षात घेऊन अभ्यासक्रम ठरवावा. शेतीच्या कामासाठी कोणते भौगोलिक घटक महत्त्वाचे आहेत ते लक्षात घेऊन त्यांचा समावेश करावा. अशाच प्रकारे प्रत्येक विषयाचे नेमके योगदान कुठे व कसे असावे ते लक्षात घेऊन अभ्यासक्रम बनवावा. या विचारांहून अधिक चांगले विचार व अभ्यासक्रम – निर्मितीची प्रक्रिया असूच शकणार नाही.”

—————————————————

आपल्या शालेय शिक्षणाबद्दल जे काही प्रसार माध्यमांतून छापून येते ते काहीसे एकांगी स्वरूपाचे असते, त्यातून मुख्यत: शालेय शिक्षणाचे व्यवस्थापन, प्रवेश-प्रक्रिया, वार्षिक वेळापत्रक व सुट्ट्या, शाळांचे वेगवेगळे प्रकार व तथाकथित दर्जा, परीक्षा पद्धती, शिस्तीच्या अव्वाच्या सव्वा कल्पना इत्यादी प्रशासकीय अंगांची चर्चा केलेली आढळते. त्यातही व्यक्तिनिष्ठता व केवळ काही विशिष्ट गटाच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता वाहत तसेच अत्यंत अपुर्‍या अनुभवाच्या व तोकडया ज्ञानाच्या आधारे चर्चा केलेली जाणवते. हे झाले शिक्षणाचे ‘प्रशासकीय अंग’.

दुसरी बाब हिरिरीने चर्चिली जाते ती पालकांच्या आर्थिक स्थितीबद्दल. त्यामध्ये प्रामुख्याने मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च, सरकारी अनुदाने, विनाअनुदानित शाळा, दफ्तराचे वाढते ओझे व खर्च इत्यादी ‘आर्थिक’ अंगांचा विचार होत असतो.

हेही वाचा :-

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि महाराष्ट्रातील त्रिभाषा सूत्र

नवनवीन शैक्षणिक धोरणे आणि आकृतिबंध

माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा व जो कळीचा विचार असावयास हवा, पण जो फार कमी चर्चेत येतो तो म्हणजे खरा ‘शैक्षणिक’ (अ‍ॅकॅडेमिक) हा होय. मुळापासूनच शिक्षणपद्धती कशी व कोणती असावी? त्यातील कोणत्या विषयांना प्राधान्य किती व का द्यावे? अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके, आशय, विभाग व घटक/धडे: व्यवसाय, प्रश्‍नपत्रिका, प्रश्‍नांचे स्वरूप, खरे मूल्यमापन, जीवनावश्यक कौशल्ये, पाठ्यपुस्तकांचा व प्रश्नपत्रिकांचा दर्जा, अभ्यासक्रमाचा जीवनाशी संबंध इत्यादी मूलभूत व खर्‍या ‘शैक्षणिक’ स्वरूपाची चर्चा या माध्यमांतून फारच किरकोळ व वरवरची असल्याचे आढळून येते. म्हणूनच येथे मुख्यत: शैक्षणिक स्वरूपाच्या समस्यांचा विचार अधिक आवश्यक वाटतो.

पूज्य विनोबाजींच्या शब्दांमध्ये सांगावयाचे तर ‘‘स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण नवीन ध्वज स्वीकारला, नवीन राष्ट्रगीत ठरविले, राज्यभाषा, राज्य घटना, नवीन राष्ट्रचिन्हे, प्राणी, पक्षी इत्यादी आपले म्हणून नव्याने स्थापन केले. मात्र शिक्षणपद्धती आपण बदलली नाही, तर जी ब्रिटिशांच्या उपयोगी असलेली शिक्षणपद्धती, तशीच्या तशीच शिवाय इंग्रजी माध्यमातूनच चालू ठेवली!’’ त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिथेच आपली पहिली व मोठी चूक झाली. आपल्या स्वतंत्र देशाची शिक्षणपद्धती कशी असावी, याबद्दल म. गांधीजींनी आधीपासूनच विचार केला होता. त्यात भर घालत पूज्य विनोबाजींनी ती पद्धती अधिक सुकर, सुयोग्य, शास्त्रशुद्ध व जीवनाशी निगडीत केली. सदर पद्धती ‘बुनियादी तालीम’ म्हणून प्रसिद्ध झाली व तिचा आपण प्रयोग सुरू केला होता. मात्र ‘काळे’ ब्रिटिश साहेब, उच्चभ्रूवर्गाचे हितसंबंध, अपरिपक्व नेते व राजकारण अशा अनेक कारणांनी मुद्दामहून त्या पद्धतीमध्ये खोडा घातला गेला. परिणाम असा झाला की पूर्वीचीच ‘बाबू‘ तयार करणारी व केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित शिक्षण पद्धतीचे प्रयोगामागून प्रयोग सुरू राहिले! सदर व्यवस्थेबद्दल पूज्य विनोबांनी १९६९ सालातच असे उद्गार काढले की, ‘‘सरकारने (आपल्याच) आपली शिक्षणपद्धती इतकी बिघडवून ठेवली आहे की अजून त्यात बिघडण्याचे काही शिल्‍लकच राहिले नाही!’’

सर्व राज्यांचे शिक्षणमंत्री जेव्हा पंडित नेहरूजींना मार्गदर्शनासाठी भेटण्यास गेले होते तेव्हा पंडितजींनी सांगितले, ‘‘तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात, तुम्ही सर्व आत्ता वर्ध्याला जा व आचार्यांची भेट घ्या. त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे….. आणि ते सांगतील त्याप्रमाणेच शिक्षण-धोरण आखा.’’ सर्व राज्यांचे शिक्षणमंत्री वर्धा येथे गेले व आचार्यांची भेट घेतली. आचार्य म्हणाले ‘‘फक्त एकच काम प्रथम करा. तुमची मुलं ज्या प्रकारच्या शाळेत जातील त्याच प्रकारच्या शाळेत सर्वच (आम) जनतेची मुलं शिकतील हे पाहा!’’ (तरी अजूनही सर्वत्र समान शिक्षण पद्धतीची  चळवळ

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 3 Comments

 1. dabhay

  अप्रतिम

 2. pranavs

  अंत्यंत सुस्थिती मांडणारा लेख आहे….खरोखरच पुस्तकी शिक्षण कितपत योग्य आहे याचा विचार करण्यापेक्षा त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे… प्रत्येक गोष्टीची माहिती अशी द्यावी की त्या विद्यार्थ्याला पुढे जाऊन याचा काय उपयोग होईल? परंतु कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण सुरु झाल्यामुळे अशा पद्धतीचा विचार काही शाळांनी केला आहे. तर अश्या शाळांमध्ये चाललेल्या उपक्रमांची माहिती सर्वांनी करून घेणे योग्य ठरेलं..

 3. mayurichavan

  अप्रतिम लेख,
  विषयाचे नेमके योगदान कुठे व कसे असावे ते लक्षात घेऊन अभ्यासक्रम बनवावा. हेच योग्य

Leave a Reply