ई-पुस्तकांचा सुकाळ व्हायला आणखी पाचपन्नास वर्षांचा काळ लागला असता, तो करोनाच्या संकटामुळे काहीसा अलीकडेच येऊ घातल्याची प्रचिती सध्या आपण घेतच आहोत. पुस्तकांचं स्वरूप बदललं तरी पुस्तकप्रेमी पुस्तकं वाचतच राहणार हेही तितकंच खरं! पुस्तकवेड्यांना नवी पुस्तकं हवी असतात तशी जुनीही. नवी पुस्तकं त्याला दुकानात सहज उपलब्ध होतात. आता तर घरबसल्या ऑनलाइनही पुस्तकांची खरेदी करता येते. पण प्रश्न असतो तो जुन्या दुर्मीळ ग्रंथांचा, असे ग्रंथ शहरातल्या एखाद्याच जुन्या ग्रंथालयात उपलब्ध असतात. असे ग्रंथ ऑनलाइन आणि तेही मोफत उपलब्ध झाले तर? अभ्यासकांना, पुस्तकप्रेमींना असे ग्रंथ ऑनलाइन उपलब्ध करून देणाऱ्या संकेतस्थळाविषयी माहिती देणारा मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाचा विद्यार्थी प्रणव सलगरकरचा हा लेख –
----------------------------------------------------------
गेले पाच महिने आपण सर्वच करोनाच्या महामारीने त्रस्त आहोत. हे संकट कधी संपेल कोणालाच माहीत नाही. इतके दिवस स्थगित असलेलं जनजीवन आताशा पूर्वपदावर येऊ पाहतंय. तरी अनेक वाचकांसाठी, अभ्यासकांसाठी पर्वणी असणारी ग्रंथालयं अजूनही सुरू झालेली नाहीत. त्यामुळे पुस्तके कशी वाचायची? हा प्रश्न पडतोच. पण तंत्रज्ञानामुळे पुस्तकं घरात म्हणजे आपल्या स्क्रिनवर उपलब्ध झाली तर? तीही मोफत! हो, तुम्ही बरोबर ऐकताय, अनेक नवी-जुनी पुस्तके आता विविध स्वरूपात आंतरजालावर(इंटरनेटवर) उपलब्ध झाली आहेत, ती या तंत्रज्ञानामुळेच! ई-ग्रंथालय म्हणता येईल अशा संकेतस्थळाविषयी आपण या भागात जाणून घेणार आहोत
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मराठी अभ्यास केंद्र , मराठी प्रथम , मराठी ऑनलाईन , मराठी संकेतस्थळ , प्रणव सलगरकर , मराठी पुस्तके , ईमराठी , वाचू आनंदे
प्रतिक्रिया
चला, मराठी ऑनलाइन वाचू या...! (भाग – सहा)
मराठी प्रथम
प्रणव सलगरकर
2020-09-10 13:59:22
dabhay
5 वर्षांपूर्वीअप्रतिम सोय ।
5 वर्षांपूर्वी
उपयुक्त उपक्रम