"पहिले दोन महिने ही मुलं शिक्षकांना सेठ, मॅडम म्हणत असत. त्यांच्या 'मॅडम' शब्दाचा अर्थ शिक्षक नव्हे, तर आपल्या पदरात भीक म्हणून काहीतरी टाकणारी व्यक्ती असा होता, हे कळायला आम्हाला दोन महिने गेले. सेठचा सर आणि मॅडमची बाई असा सिग्नल शाळेच्या मुलांच्या बालविश्वाचा प्रवास होता. कपडे कधी धुवायचे नसतात, रोज अंघोळ करायलाच हवी असं काही नसतं, दात घासणं ही काय रोजची गरज नाही, इथपासून ते दोन वेळेचं जेवण देणं हे आईवडीलांचं काम आहे हा देखील या मुलांच्या जगातला नियम नाही. त्यामुळे या गोष्टी करताना आपण जगावेगळं काहीतरी करत आहोत असं त्यांना वाटत होतं." ठाणे येथील सिग्नल शाळेत प्रकल्प प्रमुख आणि शिक्षक म्हणून कार्यरत आरती पवार – परब यांचा शिक्षणामुळे मुलांमध्ये काय बदल होऊ शकतो, याविषयीचे अनुभव कथन करणारा हा लेख -
-------------------------------------------------------------------------
ठाण्याच्या तीन हात नाका पुलाखाली सिग्नलवर भिक्षेकरी म्हणून जगणाऱ्या मुलांसाठी शाळा सुरू करायचे ठरले, तेव्हा कंटेनरपासून बनवलेल्या वर्गखोलीचा दरवाजा कुठल्या दिशेने हवा यावर बराच खल झाला. सिग्नलकडे तोंड करून की सिग्नलला पाठ करून असे ते द्वंद्व होते. अखेर, मुलांच्या त्या सिग्नलवरच्या जगाला पाठ करण्याचा निर्णय घेतला. पण नुसता कंटेनर पाठमोरा ठेवून त्या जगापासून लांब पळता येणार नाही, असे आम्हांला जाणवले. शाळेत मुलांच्या भावविश्वातील वास्तवाने असे काही झटके दिले की, एका वेगळ्या धाटणीची शिक्षणपद्धती या म ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘मराठी प्रथम’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.
मराठी अभ्यास केंद्र
, मराठी प्रथम
, आरती पवार
, सिग्नल शाळा
, वंचितांच्या शाळा
4 महिन्यांपूर्वी
तुमच्या कार्याला सलाम.
pkshitija
5 महिन्यांपूर्वीकामाची तळमळ आणि त्याची फलनिष्पत्तत्तीही दिसतेय. पुढील कार्यास शुभेच्छा!
csandhya
5 महिन्यांपूर्वीफार छान! प्रेरणादायी अनुभव