बोलीभाषांची ढाल आणि भाषेची शुद्ध – अशुद्धता (भाग – एक)

भाषेची शुद्ध-अशुद्धता हा प्रश्न तसा आजचा नाही. त्याला प्रमाण-अप्रमाण म्हटलं तरी तपशिलात फार फरक पडत नाही. आजवर शुद्धतेच्या बाजूचे आणि विरोधातले दोन्ही गट आपापली बाजू मांडत आलेले आहेत. आपल्याकडे भाषेच्या शुद्धतेशी जातिव्यवस्थेचाही एक पदर असल्याने हा प्रश्न निखळ भाषेच्या उच्चारांपुरता मर्यादित राहत नाही. आणि अलीकडे शाळेचे माध्यम निवडतानाही मनातून मराठीला आधीच फुली मारलेल्या काही पालकांना शुद्धतेचा हा प्रश्न भारीच कळीचा मुद्दा वाटू लागला आहे.  भाषा-शुद्धतेसंदर्भात अशा विविध अंगांना स्पर्श करणारी पत्रकार नमिता धुरी यांची ही लेखमालिका  –

——————————————

एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या पालकाला तुम्ही मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व समजवायला गेलात की, तो बोलीभाषेची ढाल पुढे करतो; स्वत:च्या नाही तर आदिवासींच्या. मराठी शाळांच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ‘बोलीभाषा’ या शब्दाला ढाल म्हणून वापरले जाते. अशा पालकांचे म्हणणे असते की, “मातृभाषेतून शिक्षणाचा विचार करताना बोलीभाषा बोलणाऱ्या मुलांचा विचार केला जात नाही. त्यांच्यासाठी मराठी शाळांमधली प्रमाण मराठी ही परकीच भाषा असते. त्यामुळे त्यांच्या मातृभाषेत म्हणजेच बोलीभाषेत शिक्षण उपलब्ध व्हायला हवे. तोपर्यंत मातृभाषेतून शिक्षणाच्या आग्रहाला काही अर्थ नाही ”.

खरं तरअशी तक्रार करणारे पालक कोणतीही आदिवासी बोलीभाषा बोलणारे नसतात. त्यांच्या स्वत:च्या घरात प्रमाण मराठीच बोलली जात असते. याचाच अर्थ प्रमाण मराठी ही त्यांची बोलीभाषा आहे. जे पालक आपल्या बोलीभाषेत म्हणजेच प्रमाण मराठीत उपलब्ध असलेलं शिक्षण नाकारतात आणि मुलांना परक्या इंग्रजी भाषेतून शिक्षण घेण्यास भाग पाडतात, त्या पालकांना आदिवासी बोलींची काळजी का बरं वाटत असेल? ‘बोलीभाषांतून शिक्षण उपलब्ध व्हायला हवं’, हा एक आदर्श विचार नक्कीच आहे. पण प्रमाण मराठी हीसुद्धा एक बोलीभाषाच आहे आणि या भाषेत किमान दहावीपर्यंतचं शिक्षण उपलब्ध आहे. इतर बोलीभाषांमध्ये ते तयारच झालेलं नाही. जे उपलब्ध आहे, ते आपण जपू शकलो तरच जे उपलब्ध नाही ते निर्माण करता येऊ शकेल. पण या तार्किक मुद्द्यांशी पालकांना काहीच देणेघेणे नसते; कारण त्यांचा युक्तिवाद ‘मातृभाषेतून शिक्षणा’चा वार उलटवून लावण्यासाठी केलेला असतो. त्यात बोलीभाषांबद्दल आपुलकी वगैरे काही नसते.

हेही वाचलंत का?

मराठी शाळा नेमक्या इथेच चुकतात…!

मराठी शाळा आणि पैसेवाल्यांच्या पळवाटा

तसेच, इंग्रजी माध्यमाच्या पालकांचा दुसरा युक्तिवाद असाही असतो की, ‘मराठी शाळांमधल्या शिक्षकांचे उच्चार अशुद्ध असतात. म्हणून आम्ही आमच्या मुलांना तिथे पाठवत नाही’. हे मत पालकांनी ऐकीव माहितीच्या आधारावरच तयार केलेले असते. सरसकट सर्व मराठी शाळांमधल्या सर्व शिक्षकांचे उच्चार अशुद्ध असते तर आपण शुद्ध उच्चार कसे शिकलो असतो, इतका साधा

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

  1. chandratre_adv@yahoo.co.in

    माहीतीपुर्ण लेख

  2. jrpatankar

    खूपच छान. अभ्यास तळमळ दोन्ही आहे.

Leave a Reply