शब्दांच्या पाऊलखुणा - केरसुणीला किनखापाची गवसणी (भाग - सतरा)


स्वयंपाकघरात भांडी धरण्यासाठी वापरला जाणारा चिमटा किंवा पकड याला महाराष्ट्राच्या काही भागात ‘गावी’ असंही म्हटलं जातं. अंगठा आणि त्याच्या शेजारच्या बोटाची होते ती चिमट, अन् या चिमटीत मावेल एवढा पदार्थ म्हणजे चिमूटभर. तर स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या पकडीच्या टोकाचा आकारही अंगठा आणि त्याच्या शेजारच्या बोटाने होणाऱ्या चिमटीसारखाच तर असतो, म्हणून तो चिमटा! त्याच्या त्या विशिष्ट आकारात भांडी सापडतात, गावतात. म्हणूनच या पकडीला ‘गावी’ म्हटलं जात असावं. काही ठिकाणी सोनाराकडील दागिन्यांना आकार देणाऱ्या चिमट्यालाही 'गावी' म्हणतात. 

---------------------------------------------------

शब्द वापरून वापरून भाषेत रुळतात अन् ते वापरले नाही की मागे पडतात. शिवाय शब्दांच्या अनेक अर्थांपैकी एकाच अर्थाने  शब्द वापरात राहिले की इतर अर्थ मागे पडतात. भाषाविज्ञानात याला अर्थसंकोच म्हटलं जातं. मिळणे, आढळणे या शब्दांचा एक अर्थ भेटणे आहे, तसेच काही वेळा विशिष्ट संदर्भात माणसेही मिळतात, हे आपण शब्दांच्या पाऊलखुणा सदरातील भाग क्र. नऊ आणि दहा या दोन लेखात पाहिल्याचं तुम्हाला आठवत असेल. याच्याशी संदर्भात आणखी एक क्रियापद आहे ‘सापडणे’. ‘शोधले की सापडते’ हा शब्दप्रयोग तर आपण अगदी सहज करतो. मात्र महाराष्ट्राच्या बऱ्याच ग्रामीण भागात वस्तू सापडत नाहीत तर घावतात.  'सापडणे' शब्दाप्रमाणे घावणे किंवा गावणे या शब्दांचे मूळही संस्कृतमध्ये असल्याचे दिसते.

हेही वाच ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शब्द व्युत्पत्ती , मराठी अभ्यास केंद्र , मराठी प्रथम , साधना गोरे , मराठी शब्द , आठवणीतले शब्द

प्रतिक्रिया

  1. dabhay

      4 वर्षांपूर्वी

    फारच छान।

  2.   4 वर्षांपूर्वी

    सापडण्याचा अर्थ चांगलाच गवसला.छान अभ्यास!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen