भाषाविचार - भाषिक संचित (भाग - ९)


एका शोधनिबंधासाठी संदर्भ शोधायचे म्हणून 'नवभारत' मासिकाचे १९५० सालापासूनचे आजपर्यंतचे अंक हल्लीच मागवून घेतले. 'नवभारत' हे शंकरराव देवांनी सुरू केलेले आणि त्यानंतर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मे. पुं. रेगे, वसंत पळशीकर अशा दिग्गजांनी चालवलेले नियतकालिक आहे. प्रादेशिक भाषांमधल्या बऱ्याच नियतकालिकांची असते तशीच या नियतकालिकाची देखील अवस्था फारशी बरी नाही. पण मुद्दा तो नाही. नेहरूंच्या भाषावार प्रांतरचनेच्या धोरणाबद्दलचा अभ्यास करण्यासाठी दर्जेदार लेखनाचा शोध घ्यायचा आणि तोही मराठीत, तर मला नवभारतकडे वळावं लागतं. पंचवीस-एक वर्षांपूर्वी माझ्या एका शिक्षकांनी वर्गणी भरली म्हणून नवभारतचे अंक मी काही वर्षे सलग वाचत होतो. त्यानंतर आवड वाटली म्हणून मीही काही काळ वर्गणीदार झालो. मधल्या काळात कधी वाचनालयात हा अंक समोर यायचा, पण थेट संबंध मात्र सुटला. वाईच्या घाटावर दरवर्षी होणाऱ्या एका व्याख्यानमालेत दोनेक वर्षांपूर्वी मी वक्ता म्हणून गेलो होतो. तेव्हा वाईतल्या 'प्राज्ञ पाठशाळेत'ली उपलब्ध असलेली सगळी पुस्तकं उचलून आणली होती. पण अंक मात्र दोन वर्षांनी हाती लागले. शरद पाटलांपासून नी. र. वऱ्हाड्यांपर्यंत आणि अ. भि. शहांपासून स. ह. देशपांड्यांपर्यंत अनेकांचं नंतर पुस्तकरूपात आलेलं लेखन इथे मला दिसलं. सगळे उद्योग बाजूला टाकून हे वाचण्यातच चार-सहा महिने घालवावे असं वाटू लागलं आहे.
नियतकालिक हा महाराष्ट्राच्या वैचारिक संचिताचा भाग आहे. असाच ठेवा भारतातल्या प्रत्येक भाषेत असेल आणि तो परिश्रमाने हाती लागला की, माझ्यासारखेच हजारो लोक अत्यानंदाने वेडावून जात असतील, हे स्पष्ट व्हावं एवढाच हेतू आहे. खरा प्रश्न असा की, 'नवभारत'सारखं नियतकालिक एखाद्या भाषेत जोम का धरत नाही? त्याला कधीच पुरेसे वर्गणीदार का मिळत नाहीत? यामागे संबंधित नियतकालिक चालवणाऱ्यांची प्रशासकीय अक्षमता असते? की एखाद्या भाषेतून ज्ञानव्यवहार गंभीरपणे चालवण्याबद्दलची आपली सामूहिक उदासीनता असते? कदाचित सगळं; पण त्यामुळे एखाद्या भाषेचं अंतिमतः नुकसान होतं हे नक्की!
माझा एक मित्र एका फिल्म सोसायटीच्या नियतकालिकाचा संपादक आहे. त्यावर 'महाराष्ट्रातल्या सिनेचळवळीचं एकमेव नियतकालिक' अशा अर्थाची जाहिरात आहे. नियतकालिक अतिशय देखणं आणि अभ्यासू लेखकांच्या लेखनाने भरलेलं आहे; मात्र मला खटकतो तो त्यातला 'एकमेव' हा शब्द. बारा कोटींच्या राज्यात सिनेविषयक चर्चा करणारी दहा नियतकालिकं का असू नयेत? सिनेमा पाहणं ज्या लोकांना आवडतं, त्यांना त्यावरची चर्चा करायला आवडतंच असं नाही, असा याचा अर्थ घ्यायचा का? मी उदाहरणं मराठीतली देतोय, कारण ती माझ्या माहितीतली आहेत. पण हीच परिस्थिती भारतातल्या अनेक भाषांची असणं सहज शक्य आहे. विविध व्यवहारक्षेत्रांमधल्या ज्ञानाचं आदानप्रदान आपल्या भाषेत का होऊ नये, हा खरा प्रश्न आहे. यासाठी काय करता येईल यावर साधकबाधक चर्चा होण्याची गरज आहे. एका वृत्त वाहिनीवरील चर्चेत इंग्रजीच्या प्रच्छन्न प्रेमापोटी उतावळेपणाने तिचं समर्थन करणारे एक संपादक जणू काही मला खिजवल्यासारखं म्हणत होते की, ‘भारतीय भाषांमधला लेखनव्यवहार किती मर्यादित आहे, त्यापेक्षा इंग्रजीत पहिलीच आवृत्ती आठ–दहा हजाराची निघते. मग तेच चांगले नाही का?’ व्यावहारिक विचार करायचा, तर त्यांच्या म्हणण्यात काही गैर नाही; पण इंग्रजीत काहीही टुकार दर्जाचं लिहून त्याच्या खपावर त्यांची गुणवत्ता मोजायची आणि मग प्रादेशिक भाषांचा आग्रह धरणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, ही आपल्या प्रसारमाध्यमांची जुनी पद्धत आहे. ज्या भाषेतली प्रसारमाध्यमं न्यूनगंडाने ग्रासलेली असतात,

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


भाषा , सिनेमा , नियतकालिके , वाचन , मराठी माणूस , दीपक पवार , मराठी अभ्यास केंद्र
भाषा

प्रतिक्रिया

  1. साधना गोरे

      11 महिन्यांपूर्वी

    छान!वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen