शब्दांच्या पाऊलखुणा - चित्रपटाला प्रेक्षकांंची मुरकंड (भाग - २१)


‘हसून हसून मुरकुंडी वळणे’ असा वाक्प्रचार आपण नेहमीच ऐकतो अन् वापरतोही. पण, महाराष्ट्राच्या काही भागात याच शब्दाची रूपं आणखी वेगळ्या अर्थाने वापरली गेलेली दिसतात. ‘मुरका मारणं’, ‘मुरकंड पडणे’ ही त्यातलीच काही. मुर-मुरका-मुरकत-मुरकंड या शब्दांचा सोदाहरण घेतलेला हा आढावा -

----------------------------------

व्ही. शांताराम यांचा ‘पिंजरा’ हा मराठीतील एक गाजलेला चित्रपट. त्यातील डॉ. श्रीराम लागू, संध्या, निळू फुले यांचा अभिनय रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवतोय. गीतकार जगदीश खेबुडकरांच्या अस्सल देशी शब्दकळेची गीतं आणि राम कदम यांचं संगीत यांमुळे त्यातील गावरान ठसक्याची गाणी जुन्या जाणत्यांना आजही आवडतात. इतकंच काय, आजच्या तरुणाईलाही त्या गाण्यांच्या रिमिक्स व्हर्जन्सवर ठेका धरायचा मोह आवरत नाही. या चित्रपटात एक गाणं आहे - ‘आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत, हिरव्या रानी... साजणी गं...’ या गाण्यातल्या ‘मुरकत’ शब्दाची रूपं शोधताना त्याचे बरेच गणगोत सापडत गेले. आजच्या या लेखात त्याचाच वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्राच्या बऱ्याच ग्रामीण भागात ‘नखरा करणं’ या अर्थाने ‘मुरका मारणं’ असं म्हटलं जातं. पिंजरा चित्रपटातील वरील गाण्यात ‘मुरकत’ शब्द आला आहे, तो याच अर्थाने. विविध शारीर विभ्रमांचा, अवयवांच्या मोहक हालचालींचा हा नखरा आहे, म्हणजेच मुरका

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


भाषा , शब्द व्युुत्पत्ती , साधना गोरे , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen