स्वभाषेचा आग्रह का धरायचा, कुणी धरायचा, तो धरताना कोणत्या गोष्टींचे भान ठेवायचे, हे सांगणारा कवी वसंत आबाजी डहाके यांचा हा लेख -
...
बीएला जाणारे विद्यार्थी साहित्याचा ‘साहित्य : एक कला’ या दृष्टीने अभ्यास करतात असे मानले तर; ते बारावीपर्यंत भाषा शिकत होते की साहित्य शिकत होते की साहित्यकृतींच्या माध्यमातून भाषा शिकत होते? असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचप्रमाणे जीवनभान, मूल्यसंस्कार इत्यादी गोष्टी बारावीपर्यंत ठीक आहेत; पुढे त्यांची काही गरज नाही; विशेषतः वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकविद्या, व्यवस्थापनविद्या इत्यादी ज्ञानशाखांकडे जाणाऱ्यांना तर काही गरजच नाही असे समजायचे काय?
भाषेचे शिक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. स्वभाषेचे शिक्षण आणि परभाषेचे शिक्षण असे दोन विषय आहेत. स्वभाषेचे, उदा. मराठीचे. ही भाषा मुलांना अवगत असते. मुले बोलत असतात, लिहिणे शिकायचे असते. त्याचप्रमाणे टप्प्याटप्प्याने जीवनाच्या विविध क्षेत्रात वापरली जाणारी भाषा शिकायची असते. स्वभाषेचे शिक्षण देत असतानाच स्वभाषेच्या बोलींचीही ओळख व्हायला हवी. खरेतर विविध बोली बोलणारी मुले प्रमाणभाषा
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
भाषा
, शिक्षण
, बोली
, वसंत आबाजी डहाके
, मराठी अभ्यास केंद्र