"सिनेमांच्या संवादपट्टया भारतीय भाषांमधून आणणं आणि सर्व महत्त्वाच्या भारतीय भाषांमध्ये जागतिक दर्जाचे सिनेमे डब करणे असा उपक्रम हाती घेतला, तर त्यातून दीर्घकालीन विचार करता फायदाच होईल, यात मला काही शंका वाटत नाही. हे करत असताना चुका होतीलच, अनवधानाने विनोदनिर्मितीही होईल. आपल्याकडचे शुद्धतावादी त्याचा बाऊ करून 'नकोच हा मूर्खपणा' असं म्हणतील. पण, कोणत्याही महत्त्वाच्या बदलाची सुरुवात चुकांमधूनच होत असते. अशा चुका इतर भाषांमध्येही झालेल्याच आहेत. आपल्या भाषांनाही अशा चुका करण्याची संधी द्यावी, तरच त्या मोठ्या होतील." - मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा सिनेमाच्या भाषेचे अर्थकारण सांगणारा हा लेख -
हेही वाचलंत का?
आपला न्यूनगंड (भाग - १०)
भाषिक संचित (भाग - ९)एखाद्या सिनेमाची भाषा कोणती असावी, याची किमान दोन उत्तरं मिळू शकतील. एक म्हणजे तो ज्या भाषेत तयार झाला आहे ती भाषा, आणि दुसरं म्हणजे त्या सिनेमातल्या चित्रप्रतिमा सांगताहेत ती भाषा. जगभरात दरवर्षी हजारो सिनेमे निघतात. त्यातले बरेचसे हॉलिवूड, बॉलिवूड पद्धतीचे असतात. पण, त्या पलीकडचा एक सिनेमा जगभरात सातत्याने लोकांपुढे येताना दिसतो. त्याला कुणी समांतर सिनेमा म्हणतं, कुणी नव्या धारेचा,
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘मराठी प्रथम’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
भाषा
, सिनेमा
, भारतीय सिनेमा
, मराठी सिनेमा
, दीपक पवार
, मराठी अभ्यास केंद्र