धान्य निवडण्याचं साधन - सूप आताशा कालबाह्य होऊ लागलं आहे, तर दुसरीकडे आपण खाद्यपदार्थांतील द्रवरूप सूप आपलंसं केलं आहे. ही दोन्ही सुपे वरकरणी भिन्न भाषा आणि संस्कृतीतील वाटतात, पण त्यांचे अंतरंग जाणून घेण्यासाठी वाचा -
...
औद्योगिक क्रांती व्हायच्या आधी जगभर पशुपालन, कृषी यांच्याशी संबंधित जीवनपद्धती अस्तित्वात होती. साहजिकच सर्वच भाषांमध्ये या संस्कृतींशी निगडित शब्दांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेली दिसते. शेती व्यवसायाशी अत्यंत जवळीक असलेले आपल्याकडील धान्य पाखडण्याचे एक साधन म्हणजे सूप. पिठाच्या गिरण्या यायच्या आधी घरोघरच्या स्त्रियांची पहाट सूप आणि जातं या दोन साधनांनीच तर सुरू व्हायची!
‘सूप’ या शब्दाचं मूळ संस्कृतमधील ‘शूर्प’ या शब्दात आहे. शिवाय गुजरातीमध्ये ‘सुपडूं’, सिंधीमध्ये ‘सुपू’ असा त्याचा उच्चार केला जातो. हे झालं धान्य पाखडण्याच्या सुपाविषयी. पण संस्कृतमध्ये मूळ ‘सूप’ असाही एक शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे, आमटी, वरण इ. संस्कृतमध्ये यावरूनच सूपकार म्हणजे आचारी – स्वयंपाकी, सूपशास्त्र म्हणजे पाकशास्त्र हे शब्द तयार झालेले दिसतात. इंग्रजीमध्ये भाज्या, मांस इत्यादींपासून बनवलेले सार, म्हणजे एक प्रकारची आमटी यालाही soup म्हटलं जातं. जर्मन भाषेत याच सुपाला झोपंSS (suppe), तर
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .