“तीच गोष्ट साहित्य संस्कृती मंडळाच्या प्रकाशनांची. त्यात अनुवादित पुस्तके आहेत, तशीच स्वतंत्र, इतर भारतीय भाषाविषयक पुस्तकेही संस्कृती मंडळाने काढली. मात्र, नव्या पिढीचे वास्तव वेगळेच होते. नव्या पिढीला नव्या वातावरणात स्पर्धायुक्त जगण्यासाठी साधने पुरविणे, दृष्टी देणे हे झाले नाही. विद्वानांनी विद्वानांसाठी चालविलेल्या संस्था असेच काहीसे शासकीय सांस्कृतिक संस्थांचे काम होते. सर्व समाजविज्ञानांच्या मराठी परिभाषा संबंधित तज्ज्ञ मंडळींनी तयार केल्या. त्या विद्यार्थ्यांप्रत पोहोचल्याच नाहीत, शिक्षक-प्राध्यापक यांनीही या संदर्भात उदासीनताच दाखविली.” - ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव यांचे मराठी भाषाव्यवहाराविषयीचे हे जळजळीत भाष्य -
...
मराठी भाषेचा सुमारे एक हजार वर्षांचा इतिहास हा काही सरळ वाढीचा व विकासाचा इतिहास नाही. प्रारंभीच्या पर्वात, म्हणजे जवळजवळ सोळाव्या शतकापर्यंत संस्कृतविरुद्ध मराठी हा वाद निदान ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात चालू होता. काव्यरचना मराठीत होत गेल्या हे खरे, महानुभाव पंथाने मराठी ही अधिकृत धर्मभाषा म्हणून पुरस्कृत केली हेही खरे; तथापि, तरीही संत एकनाथांना ‘संस्कृत वाणी देवे केले। प्राकृत काय चोरांपासून झाली?’ असा खडा सवाल समाजाला विचारायलाच लागला. यादवांचे राज्य गेले व मराठीचा राजाश्रय संपुष्टात आला. पुढे मुस्लिम राजवटी सुरू झाल्या व या परतंत्र कालखंडातही फारसी-अरबीचा मूक तान मराठी भाषक सहन करीत होतेच. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, राज्यकारभारासाठी ‘राज्यव्यवहार कोश’ हा पारिभाषिक संज्ञा-संकल्पनांचा ग्रंथ निर्माण केला. याच सुमारास संस्कृत काव्याच्या धर्तीवरचे, पण अस्सल मराठी पंडिती काव्य रचले जाऊ लागले. पुढे पेशवाई आली. या कालखंडात मराठी काव्याचा विस्तार झाला व उत्तर पेशवाईच्या काळात शाहिरांनी मराठी काव्याला खूपसे ऐहिक शृंगारिक वळण प्राप्त करून दिले. थोडक्यात, बाराव्या शतकापासून मराठी समाजाची भाषिक क्षमता व विविधांगी अभिव्यक्ती-कौशल्ये वाढवण्याची कामगिरी मराठी भाषेने केली. तिने समाजाला धर्माची व अध्यात्माची परिभाषा व प्रमेये शिकविली, पंडित कवींनी समाजाला संस्कृतातील विदग्ध काव्याची कलात्मकता शिकविली, तर विशाल जनसामान्यांचे नाट्यपूर्ण मनोरंजन करण्याची शाहिरी भाषा शाहिरांनी शिकविली. यात प्राधान्याने इहवादी वळणाचा मात्र पुरेसा तर्कसंगत विकास झाला नाही; नाहीतर, मराठी गद्य हेदेखील अठराव्या शतकातच जन्माला आले असते. जे गद्यलेखन झाले, ते बखरींच्या स्वरूपात पौराणिक वळणाचे! एकोणिसाव्या शतकात इंग्रजी राजवट आली व शासन भाषा इंग्लिश झाली. तेव्हापासून इंग्लिशविरुद्ध मराठी हा वाद सुरू झाला, हा वाद आजही काहीशा वेगळ्या संदर्भात चालूच आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात हिंदी व इंग्लिश यांना ऑफिशियल शासन भाषा म्हणून मान्यता मिळाली; म्हणजे एक प्रकारे हिंदी-मराठी स्पर्धा
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मराठी भाषा व्यवहार
, अभिजात मराठी
, मराठीचा विकास
, रा. ग. जाधव
, मराठी अभ्यास केंद्र