मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक व पत्रकार अरुण साधू यांनी पाऊण दशकापूर्वी मराठी भाषेच्या इंग्रजाळलेपणाची बजबजपुरी सांगताना, मराठीतील नातेवाचक शब्दांचे अनन्यत्वही किती खुमासदारपणे सांगितले आहे -
...
बहिणीच्या संबोधनांची तर मराठी भाषेत एक अर्थवाही परंपरा आहे. प्रादेशिक रीतिरिवाजांप्रमाणे थोडे फार फरक पडत असतील, पण या संबोधनांचा नेमका विवक्षित अर्थ असतो हे नक्की. जिजी, ताई, अक्का, माई, बाई अशी ही संबोधनं. जिजी म्हणजे सगळ्यात मोठी बहीण, म्हणजे भावंडांतील सगळ्यात मोठी, फक्त मुलींपैकी मोठी नव्हे. ताई म्हणजे बहिणीतली मोठी. त्याखाली श्रेणीने आक्का, माई आणि बाई. कदाचित प्रादेशिक भाषांमध्ये या श्रेणी बदलत असतील, पण नेमकेपणा हे वैशिष्ट्य. तीच गोष्ट दादा, नाना, आप्पा आणि भाऊ या संबोधनांची पूर्वी असावी, पण नंतर तो काटेकोरपणा गेला. वऱ्हाडात आणि मराठवाड्यात बहिणींच्या संबोधनांचा काटेकोरपणा पाळणारी अजून कित्येक (ब्राह्मणी) कुटुंबं दिसतात. कौटुंबिक गाण्याची एक अवखळ ओळ या संबोधनांचा नेमकेपणा दर्शविते.
आक्का मारे बोका ताई मारे घूस
खरं की खोटं ते जिजीला पूस.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
इंग्रजाळलेली मराठी
, मराठीतील नातेसंबंधदर्शक शब्द
, अरुण साधू
, मराठी स केंद्र
चिंतन