नव्या शैक्षणिक धोरणातील प्राथमिक शिक्षण


नव्या शैक्षणिक धोरणातील प्राथमिक शिक्षण (इ. तिसरी ते पाचवी) विनोबाजींच्या कार्य-केंद्रित शिक्षण पद्धतीनुसार कसे असायला हवे, याचा उदाहरणांसह आढावा घेणारा, शिक्षण-अभ्यासक प्रा. विद्याधर अमृते यांचा हा लेख -
पाच वर्षांच्‍या मूलभूत शिक्षणाच्‍या टप्‍प्‍यानंतर तीन वर्षांचा प्रारंभिक शिक्षणाचा टप्‍पा नव्या शैक्षणिक धोरणात सुचविला आहे. म्‍हणजेच सध्याच्‍या निम्‍न प्राथमिक शिक्षणाचा तीन वर्षांचा टप्पा - इ. तिसरी, चौथी व पाचवी - असा धरला गेला आहे. या टप्‍प्‍यापासून हळूहळू भाषा, शब्‍दसंपत्ती, आकडेमोड व परिसरातील ज्ञान अपेक्षित होते व आहे.
या ‘प्राथमिक’ टप्‍प्‍यामध्ये अभ्यासक्रम व पाठयपुस्‍तके तयार करताना फार काळजी घेणे आवश्यक आहे. या टप्‍प्‍यावर
(१) एकीकडे उपयुक्त ज्ञान मिळवीत जाणे हे अपेक्षित असते.
(२) त्‍या ज्ञानाचे विश्लेषण पुढच्‍या टप्‍प्‍यावर होणे व नंतर
(३) त्‍यावरच्‍या टप्‍प्‍यावर उपयोजनावर भर देणे आवश्यक आहे.
(४) या सर्वांसाठी अपेक्षित कौशल्‍ये सरावांसह त्‍या-त्‍या टप्‍प्‍यांवर आत्‍मसात करणे उपयोगी व योग्‍य ठरेल.
या क्रमवार टप्‍प्‍यांना मूल्‍यमापनातही यथायोग्य स्‍थान देणे आवश्यक आहे. प्रश्नांच्‍या स्‍वरूपात हेच टप्‍पे असे मांडता येतील :-
(१) काय/कोठे/कधी
(२) का व कसे
(३) उपयोग कसा (उपयोजन)
(४) समस्याप्रधानता व उकल याकडे वाटचाल.
(५) प्रात्‍यक्षिके – हे सर्व सैद्धांतिक रूपात न मांडता प्रत्‍यक्ष कामातून अनुभवणे, शिकणे यावर भर दिला पाहिजे. म्हणजे कृती हेच शिक्षणाचे माध्यम असावे. याविषयी आचार्य विनोबाजी म्‍हणतात, भाषा नव्‍हे तर कार्य हेच शिक्षणाचे माध्यम असते.
वरीलपैकी पहिल्या तिन्‍ही स्‍तरांवर योग्‍य कौशल्‍ये हळूहळू आत्‍मासात केल्यानंतर शिक्षण व त्यासंबंधी उपयोगी कार्य एकरूप झाले पाहिजे.

कार्य-केंद्रित शिक्षणाकडे वाटचाल
एकीकडे अभ्यासक्रमात कार्य-केंद्रित स्‍वरूप व शिक्षणात रचनावाद हे प्रत्‍यक्ष उदाहरण देऊन मांडावयाचे झाले तर, पुढील सार्वत्रिक स्‍वरूपाचे उदाहरण अभूतपूर्व ठरेल असे वाटते.
कार्य :- काकडीची कोशिंबीर (आदिवासी क्षेत्रालाही लागू)
अभ्यासक्रमाची रचना – विविध टप्‍पे (दोन प्रकार देशी / दोन विलायती)
वेगवेगळ्या टप्प्यांवर या घटकांची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे असतील :-
मूलभूत शिक्षण (बालवर्ग) :-
क :– कटकट, कचकच
का :– कालविणे, काकडी
कि :– किस, किसणी
कु :- कुस्‍करणे
कू :– कूट
को :- कोशिंबीर
इ. ३ ते ५ वी :-   दाणे‚ भाजणे‚ कूट (Assembly Line)
इ. ६ ते ८ वी :- अधिकाधिक चविष्ट + कोथिंबीर + ओलं खोबरं (नारळ)
चमचा‚ काचेचे वाडगे (Glass Bowl) + लिंबू पिळणे + मिरच्‍यांचे बारीक तुकडे करणे.
इ. ९ ते १० वी :- मिश्र कोशिंबीर +  टॉमेटो / कांदा (बारीक चिरणे)
इ. ११ ते १२ वी :- काकडीचे उत्‍पादन (कृषी) ‚ दर्जा / सेंद्रिय उत्पादने
सालींचा पुनर्वापर, टिकविणे‚ वाहतूक‚ किंमत‚ विक्री‚ फायदा.
(टीप : कोशिंबिरीतील विविधता)

विविध घटकांच्‍या प्रमाणात बदल :- अधिक तिखट / गोड / आंबट
नवीन घटकांची भर :- दही‚ डाळिंबाचे दाणे, गाजर किस / मुळा किस
(Permutation – Combination)

आठवडयाच्‍या सातही दिवशी सात प्रकारच्‍या कोशिंबिरी
काकडीचे इतर पदार्थ (कायरस), लोणचे
शिकरण, Salad, केळी टरबूज‚ रताळी‚ साबुदाणा‚ रबडी, दुधी भोपळा, गाजर बीट,  रवा खीर.
भाज्‍या :- सुकी / पातळ
उसळी :- मूग‚ चवळी‚ मटकी‚ चणा‚ डाळिंब्‍या (वाल)‚ राजमा‚ वालपापडी‚ मटार (वाटाणा)
भात – (प्रकार)
चपाती / भाकरी / पुऱ्या / पापड
कोशिंबिरी (प्रकार) :- कांदा +  टॉमेटो + काकडी + मुळा
लोणची : (प्रकार) : आंबा‚ लिंबू‚ मिश्र, पेरू‚ भोकरं‚ करवंद
दूध / मलाई – दही – ताक – पीयूष‚ बासुंदी (रबडी), लोणी – तूप, चक्का‚ श्रीखंड‚ आम्रखंड‚ आंबावड्या (टिकाऊ)
मसाल्‍याचे पदार्थ - (विशेष चव आणणारे पदार्थ)
(टीप :- मुंबईत इंग्रजी शिशुवर्गामध्ये (केजीमध्ये) बहुधा लिंबू सरबत बनविण्यास शिकवितात.)
- विद्याधर अमृते
(लेखक भूगोल विषयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)
संपर्क - ९६१९६७९५७०

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


नवे शैक्षणिक धोरण , प्राथमिक शिक्षण , कार्य-केंद्रित शिक्षण , विद्याधऱ अमृते , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Aviraj Marathe

      4 वर्षांपूर्वी

    चांगली कल्पना आहे. मुलांना त्यामुळे पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार्य ज्ञानही संपादन करता येईल.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen