शब्दांच्या पाऊलखुणा - म्हणे वडाला वांगी! (भाग - २४)


“एखाद्याला कष्टाच्या मानाने फार कमी मोबदला मिळाला तर ‘सारी रात्र जागली आणि वांगे भाजी रांधली’ म्हटलं जातं. एकाकडून दुसऱ्याकडे अन् दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशा पसरत जाणाऱ्या कर्णोपकर्णी गप्पांना ‘सांगोवांगीच्या गोष्टी’ म्हणण्याची पद्धत आहे. अशाच पसरत जाणाऱ्या अशक्यप्राय गोष्टीसंबंधी ‘सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी’ ही म्हण वापरली जाते. मात्र आजच्या वेगवान समाजमाध्यमांच्या काळात वडाच्या झाडाला वांगी आणण्यात आपला हातभार लागू नये, एवढी काळजी तर आपण नक्कीच घेऊ शकतो!” – वांगे या शब्दाचा मागोवा घेणारा हा लेख
राजा अकबर आणि बिरबल यांची वांग्याविषयीची ती प्रसिद्ध गोष्ट सर्वांनाच ठाऊक आहे. अकबर वांग्याची भाजी खाऊन वांग्याचं खूप कौतुक करतो अन् मग बिरबलही त्यात भर घालतो. मग एक दिवस अकबराला वांग्याची भाजी आवडत नाही आणि तो वांग्याला नावं ठेवतो, तर बिरबरलही त्यात पुढाकार घेतो. अकबराला कळत नाही की, यावेळी बिरबर आपल्या हो ला हो कसं म्हणतोय अन् तो त्याला त्याचं कारण विचारतो. बिरबल म्हणतो, ‘प्रत्येक वेळी वांग्याचं कौतुक करायला मी वांग्याचा चाकर नाही,  तुमचा चाकर आहे.’ स्वामीनिष्ठा हे या गोष्टीचं तात्पर्य असलं तरी वांग्याच्या भाजीची ही गोष्ट कशी भारतातील बऱ्याच भाषांमध्ये आहे, हे इथं मला तुम्हांला सांगायचं आहे.
वांगे ही उंच डोंगराळ प्रदेश वगळता भारतात सर्व ठिकाणी वर्षभर पिकवली जाणारी फळभाजी आहे. वांग्याला संस्कृतमध्ये  ‘वृन्ताकम्’, ‘वंगनः’, ‘वङ्नः’, ‘वंग’ असे अनेक शब्द आहेत. तर पालीमध्ये त्याला ‘वातिङ्ननो’ म्हटले गेले असून; प्राकृतमध्ये ‘वाइगण – वाइगणी – वाइगिणी’ अशी त्याची रूपे दिसतात. आर्यभारतीय भाषांमध्ये ‘वांगे’ या शब्दाची रूपे पाहता बंगालीमध्ये ‘बेंगन’, हिंदीमध्ये ‘बैंगन’, पंजाबीमध्ये ‘बाइँगण’, गुजरातीमध्ये ‘वेंगण’ म्हटलं जातं. द्राविडी कुळातील भाषांमध्ये म्हणजे तमिळमध्ये ‘वळुदलेइ’, कानडीमध्ये ‘बसदनि’ तर मल्याळीमध्ये ‘वळुहिनी’ म्हटलं जातं. तर मराठीशी संपर्क आलेल्या फारसीमध्ये वांग्याला ‘बदिनजान’ असा  शब्द आहे. इंग्रजीतला ‘ब्रिंजल’ तर सर्वांना माहीत आहे.
आर्यभारतीय भाषा, द्राविडी भाषा आणि मराठीशी संपर्क आलेल्या फारसी, इंग्रजी या भाषांतील वांग्याचे प्रतिशब्द पाहिले तर, त्यांच्या उच्चारांत काहीएक साम्य जाणवते; तसे काहीएक भिन्नत्वही दिसते. याविषयी सांगताना कृ. पां. कुलकर्णी ‘व्युत्पत्तिकोशा’त म्हणतात,  मूळ संस्कृत शब्द स्पष्ट व निश्चित नाही. संस्कृतमधील वात+इंगन = वातहारक हा शब्द ऑस्ट्रिक आहे का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. भारतातील जे मूळ रहिवासी –

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शब्दवेध , शब्द व्युत्पत्ती , शब्दांशी मैत्री , वांगे , साधना गोरे , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen