“दरवर्षी समितीतर्फे बालचित्रपट महोत्सव होतो. त्यासाठी देशाच्या विविध भागांतून मुलं आमंत्रित केली जातात. पण, सर्वसाधारणपणे ही मुलं केंद्रीय विद्यालयांमधली असतात असं सांगण्यात आलं, असं का व्हावं? केंद्रीय विद्यालयांमध्ये शिक्षणाचं माध्यम प्राधान्याने इंग्रजी आहे. त्यातही तिथली मुलं ही सर्वसामान्यपणे सनदी अधिकाऱ्यांची असतात. हे चित्रपट जर सर्व मुलांसाठी असतील, तर त्याचा महोत्सव फक्त या मोजक्या मुलांसाठीच का मर्यादित असावा? भारतातल्या विविध राज्यांमधल्या प्रादेशिक भाषेतील शाळांमधल्या मुलांना आग्रहाने या महोत्सवासाठी नेलं पाहिजे. सर्व राज्य सरकारांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून, आपल्या राज्यातले विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होतील हे पाहिलं पाहिजे.” मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा बालचित्रपटांच्या माध्यमातून मुलांच्या भाषाशिक्षणाविषयी सांगणारा लेख -
...
माझी मुलगी इतर अनेक मुलामुलींप्रमाणे भरपूर टीव्ही पाहते. सुट्ट्यांमध्ये तर त्याला ऊत येतो. यामध्ये स्वाभाविकच कार्टून वाहिन्या जास्त प्रमाणात पाहिल्या जातात. शिन्चॅन, डोरेमॉन, निंजा हातोडी, सिंड्रेला ही तिची आवडीची पात्रं आहेत. कार्टून वाहिन्यांवर भाषेचा पर्याय उपलब्ध असतो. त्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी हे पर्याय असतात. तमिळ, तेलुगू यांचेही पर्याय असतात, कारण त्या भाषा वापरणारे लोक आग्रही आहेत. मराठी-कोकणीसारख्या भाषा वापरणारे लोक आपली भाषा मनोरंजनाच्या जगात दिसावी, याबद्दल फारसे सक्रिय नसल्यामुळे हिंदी-इंग्रजीला पर्याय राहत नाही. शिवाय, कार्टून्सचं जगही तेच-तेच सांगणारं आहे. अशावेळी मुलांना नवीन काय सांगावं असा विचार करत असताना, बालचित्र समितीच्या (Children’s Film Society, India) चित्रपटांचा खजिनाच हाती आला. विविध भारतीय भाषांमधल्या सिनेमांची थोडक्यात माहिती देणारा अतिशय देखणा कॅटलॉग, अगत्याने विक्रीसाठी मदत करणारे कर्मचारी असा सर्वसाधारणपणे सरकारी खात्यात न आढळणारा प्रकार इथे दिसला. एखादा खजिना लुटावा तसे मी तिथून माझ्या आणि मित्रमैत्रिणींच्या मुलांसाठी सिनेमे घेऊन आलो.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
भाषाशिक्षण
, भाषाविचार
, बालचित्रपट
, डॉ. दीपक पवार
, मराठी अभ्यास केंद्र
Aviraj Marathe
4 वर्षांपूर्वीकोविड काळात बदललेल्या जीनवपद्धतीमुळे मुल जास्त वेळ घरातच आहेत. ह्या वेळेचा अशा चित्रपटांमधून भाषाविचार व संस्कार रूजविण्यात चांगला वापर होऊ शकेल. सरकारने निश्चितच अनुकरण करावा असा हा कार्यक्रम आहे.