“अभ्यासक्रम ठरविताना कधी-कधी तथाकथित तज्ज्ञांची अशी कल्पना असते की, जो अभ्यासक्रम सध्या महाविद्यालयीन स्तरावर असतो, तो शालेय स्तरावर ‘घुसडला’ की शिक्षणाचा दर्जा वाढेल! पण, ही प्रवृत्ती मारक ठरते. अभ्यासक्रम हा वयोगट लक्षात घेऊन ठरविला जावा. त्यातील घटकांचे औचित्य त्या-त्या पातळीवर लक्षात घ्यावे.” शिक्षण-अभ्यासक प्रा. विद्याधर अमृते यांचा माध्यमिक शिक्षणावरील लेख
नवीन शिक्षण धोरणात इयत्ता सहावी, सातवी आणि आठवी या स्तरांवरील शिक्षण हे ‘माध्यमिक’ या सदराखाली ओळखले जाणार आहे. ‘प्रारंभिक स्तरांवरील’ विद्यार्थी या माध्यमिक स्तरावर आल्यावर त्यांच्या शिक्षणात सर्वच दृष्टीने वाढ होत जाणार आहे. ही वाढ केवळ संख्यात्मक नसून गुणात्मक असावी अशी अपेक्षा आहे.
या स्तरावर विविध विषयांचा अभ्यासक्रम व स्वरूप वेगवेगळे असेल; मात्र त्याचबरोबर प्रत्येक विषयाचा दुसऱ्या विषयाशी संबंध स्पष्ट करण्याची सुरुवात असू शकेल. उदा. प्राकृतिक भूगोल व भौतिकशास्त्र, इतिहास व भूगोल, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र इ. विविध विषयांचे आंतरशाखीय स्वरूप स्पष्ट करण्याची सुरुवात या टप्प्यावर होऊ शकेल. याबाबत पुष्कळदा घाई करण्यात अर्थ नसतो; कारण एक विषय नीट समजला तरच दुसऱ्या विषयाशी असलेला दुवा स्पष्ट होऊ शकतो. न्यूटनचा नियम माहीत असल्यासच भरती, ओहोटी कशी होते ते नीट समजते; मात्र तसं केलं नाही तर प्राकृतिक भूगोल वर्णनात्मक केला जातो. हवेचे भौतिक गुणधर्म माहीत असल्यास प्राकृतिक भूगोलातील ‘वातावरण’ या घटकाचा अभ्यास सुकर होतो.
या ‘माध्यमिक’ स्तरावर मूलभूत व पारंपरिक शालेय अभ्यासाचे विषय अनिवार्य असतील की पर्यायी विषय देऊन विषय-निवडीचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना किंवा शाळांना असेल, याबद्दलचे धोरण स्पष्ट हवे. कोणत्याही शिक्षण धोरणात इयत्ता आठवीपर्यंत सर्व विषय अनिवार्य करावेत व आहे तीच पद्धत चालू ठेवावी, असे मला वाटते. त्यास Board General Education अशी शब्दरचना पूर्वीच्या आयोगात वापरली होती. आपल्या राज्यात (महाराष्ट्र) तर आठवीपर्यंत नव्हे, तर अगदी दहावीपर्यंत सर्व शालेय पारंपरिक विषय अनिवार्य आहेत व तेच योग्य आहे. सर्व संबंधित विषयांची तोंडओळख व मूलभूत स्वरूप व संकल्पना हायस्कूलच्या स्तरावर झालीच पाहिजे. (सध्याच्या I. C. S. E. च्या धोरणाप्रमाणे गणित हा पर्यायी विषय आहे, तसे होऊ नये.) प्रत्येक विषयाचे जीवनात जे औचित्य (Relevance) आहे, ते समजून अभ्यासक्रम बनवावा, तो कसा जीवनाभिमुख आहे ते कळावे. (उदाहरणार्थ घरबांधणीत भूमितीचे ज्ञान कसे व कुठे औचित्यपूर्ण आहे ते समजावे. भूगोलाचे ज्ञान कृषी-व्यवसायात कितपत व कसे उपयोगी असते, हे स्पष्ट करणारा अभ्यासक्रम हा अधिक जीवनाभिमुख असेल.
अभ्यासक्रम ठरविताना कधी-कधी तथाकथित तज्ज्ञांची अशी कल्पना असते की, जो अभ्यासक्रम सध्या महाविद्यालयीन स्तरावर असतो, तो शालेय स्तरावर ‘घुसडला’ की शिक्षणाचा दर्जा वाढेल! पण, ही प्रवृत्ती मारक ठरते. अभ्यासक्रम हा वयोगट लक्षात घेऊन ठरविला जावा. त्यातील घटकांचे औचित्य त्या-त्या पातळीवर लक्षात घ्यावे.
एकूणच, या माध्यमिक स्तरावर पुढील उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षणाचा पाया पक्का व्हावा. प्रत्येक घटकामध्ये तत्त्वांचा अभ्यास, संज्ञा व संकल्पनांचा अभ्यास, याचबरोबर ‘उपयोजन’ देखील लक्षात घ्यावे. अमुक एक विषय किंवा घटक आपण का शिकतो, हे लक्षात घेतले जावे. औचित्य लक्षात यावे. उपयोजन करण्यासाठी विविध क्षेत्रांतील उदाहरणे घ्यावीत. ते समजण्यासाठीची आवश्यक तंत्रे (उदा. आलेख/नकाशे) यात वाढ व्हावी व मूल्यमापन तंत्रे वरच्या दर्जाची होत जावीत.
या माध्यमिक स्तरावर कोणते विषय असावेत याविषयीचा तक्ता पुढे देत आहे. यात थोडासा फेरफार होऊ शकतो.
विषय
एकूण गुण
तासिका (आठवड्यात)
परीक्षा (तास)
मराठी (भाषा-१)
६०
६
२
हिंदी (भाषा-२)
६०
३
२
इंग्रजी (भाषा-३)
६०
६
२
गणित (अंकगणित-भूमिती) बीजगणित (?)
६०
६
२
विज्ञान (भौ+र+जीवशास्त्र)
६०
६
२
सामाजिक शास्त्रे (इतिहास+भू+ अर्थशास्त्र/राज्यशास्त्र)
६०
६
२
खेळ व शारीरिक शिक्षण (४)
Certificate
कला (चित्र/गायन) कौशल्य विकास
६०
३
३
गुण - ६०
एकूण
४० तासिका
सूचना : इयत्ता आठवीची जिल्हास्तरावर समान परीक्षा घ्यावी.
...
प्रा. विद्याधर अमृते
(लेखक भूगोल विषयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)
संपर्क - ९६१९६७९५७०
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शैक्षणिक धोरण
, माध्यमिक शिक्षण
, शालेय अभ्यासक्रम
, विद्याधर अमृते
, मराठी अभ्यास केंद्र