शब्दांच्या पाऊलखुणा - गूळ चारणारापेक्षा निंब चारणारा बरा! (भाग - २५)


"एखाद्या मराठी शब्दाचे मूळ शोधताना आपण सवयीने संस्कृत, द्राविडी आणि फार तर अरबी-फारसी या भाषेतले शब्द ताडून पाहतो. पण, बऱ्याच संस्कृत आणि द्राविडी शब्दांचे मूळ  ऑस्ट्रोएशियाटिक कुळात सापडते. मेळघाटातील कोरकू आदिवासींची कोरकू भाषा ही याच ऑस्ट्रोएशियाटिक कुळातील! कोरकू भाषेत गुळाला ‘गुर’ असंच म्हटलं जातं. याशिवाय उडिया, बंगाली यांमध्येही ‘गुर’ म्हटलं जातं, तर बिहारी, हिंदी, पंजाबी या भाषांमध्ये ‘र’ चा उच्चार किचिंत आखडता होऊन ‘गुर्’ असं म्हटलं जातं. सिंधीमध्ये ‘गुरु’, गुजरातीमध्ये ‘गोळ’, तर नेपाळीमध्ये ‘गूलियो’ म्हटलं जातं." गूळ शब्दाचे मूळ सांगतायत साधना गोरे -
मराठीत ‘गोड’ हे विशेषण पदार्थांसाठी तर वापरलं जातंच, पण व्यक्तीचं दिसणं, हसणं यासाठीही वापरलं जातं. उदा. ‘तो किती गोड दिसतो’ किंवा ‘तू किती गोड हसतेस’ असं म्हटलं जातं. गोड पदार्थ तयार करण्यासाठी गूळ किंवा साखरेची आवश्यकता असते, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण, गमंत म्हणजे ‘गोड’ हा शब्दही गुळापासूनच तयार झाला आहे, इतकं गुळाचं गोडाशी अतुट नातं आहे. गूळ आणि साखर हे दोन्ही पदार्थ उसापासूनच तयार होत असले तरी ते तयार करण्याच्या प्रक्रिया मात्र पूर्णतः भिन्न आहेत. शिवाय साखरेच्या आधी माणसाला गूळ बनवण्याची प्रक्रिया ज्ञात झालेली असावी,

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शब्दवेध , शब्द व्युत्पत्ती , शब्दांशी मैत्री , साधना गोरे , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

 1. Abhay Dhopawkar

    2 वर्षांपूर्वी

  Sudam kumbhar यांनी अप्रतिम अभिप्राय दिलेला आहेंच त्याच मताशी मी सहमत आहे. मला गूळ फारच आवडतो आणि त्या शब्दबद्दल वाचताना अधिकच आनंद मिळून गेला. फार फार धन्यवाद।

 2. Sudam Kumbhar

    2 वर्षांपूर्वी

  नमस्कार, जरी गुळ, गोड, इ. बाबत आपला लेख असला तरी नक्कीच *गुऱ्हाळ* नाही वाटला. जुन्या म्हणींचा अर्थपूर्ण उपयोग खूप आवडला. त्यातील काही म्हणी खूपच मजेशीर व नवीन पण वाटल्या. खूपच *गोड* लेख आहे 👍👍

 3. Vaishali Nake

    2 वर्षांपूर्वी

  छान लेख

 4. Jayashree patankar

    2 वर्षांपूर्वी

  खूपच छान.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen