“सगळी प्रसारमाध्यमं ‘आज, आत्ता, ताबडतोब’ या तत्त्वावर काम करत आहेत. या प्रक्रियेत कुणालाही थांबायला, जे लिहितोय ते व्याकरणदृष्ट्या बरं-वाईट कसं आहे, याचा विचार करायला सवड नाही. एके काळी वर्तमानपत्रांमध्ये मुद्रितशोधक हा महत्त्वाचा माणूस मानला जायचा. आता तो बिनगरजेचा मानला जातो. इंग्रजीत स्पेलचेकरची सोय आहे, त्यामुळे लिहिताना चुकलं तरी ते दुरुस्त करून घेता येतं. अनेक भारतीय भाषांमध्ये ही सोय नाही, त्यामुळे चुका तशाच राहून जातात. दुसरीकडे, इंग्रजीतलं आपलं लिहिणं काटेकोर व्हायला हवं, असं मानणारे लोक भारतीय भाषांच्या बाबतीत तोच आग्रह धरला की त्याला 'ब्राह्मणी कावा' म्हणतात. एकेकाळी वाचक अशा चुका बघून संपादकांना भंडावून सोडायचे. आता संपादकही निर्ढावलेत. ‘आम्ही लिहू तेच योग्य, तुम्ही कोण शहाणपणा शिकवणारे?’ असा शहाजोगपणा अनेकांमध्ये आलाय.” – मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार भाषाविचार या सदरातून प्रसारमाध्यमांच्या भाषिक अव्यवस्थेबद्दल सांगतायत -
...
गेल्या दशकभरात देशभरातल्या प्रसारमाध्यमांचा पट वेगाने बदलतो आहे. त्यात इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांचाही समावेश आहे. त्यातले काही प्रयोग मांडणीतले आहेत, काही आशयाचे आहेत. मार्केटिंग, वितरण, ब्रॅन्डिंग, जाहिराती, पेपर चालवण्याच्या एकूण प्रक्रियेचंच इव्हेंटीकरण याचाही त्यात समावेश आहे. प्रादेशिक भाषांतल्या वर्तमानपत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मोठमोठ्या साखळी वर्तमानपत्रांच्या प्रादेशिक भाषेतल्या आवृत्त्या निघत आहेत, खपांची गणितं बदलत आहेत. आपला खप किंवा टीआरपी रेटिंग इतरांपेक्षा कसं जास्त आहे हे सांगण्यासाठी 'ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन' किंवा 'टॅम रेटिंग'चे दाखले दिले जात आहेत. आपापला पेपर किंवा वाहिनी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवनव्या कल्पना लढवल्या जात आहेत. याबाबतीत टाय-बूट वापणाऱ्या, व्यवस्थापन क्षेत्रातल्या पदवीधरांना जास्त कळतं, असं त्यांचं आणि पेपरांच्या मालकांचंही मत झाल्याने संपादक हा (काही सन्माननीय अपवाद वगळता) मार्केटिंगवाल्यांचे सल्ले मुकाट ऐकून घेणारा माणूस झाला आहे.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
भाषा
, पुस्तके
, वाचन संस्कृती
, दीपक पवार
, मराठी अभ्यास केंद्र
Ashwini Gore
4 वर्षांपूर्वीमुळात मातृभाषेतून वाचन कमी झाल्याने त्याचा परिणाम आता भाषेवर होऊ लागला आहे.
Anand Kamble
4 वर्षांपूर्वीपवार सर, लेख त्रोटक झाला आहे. चांगलं काहीतरी वाचायला मिळेल, ही अपेक्षा पूर्ण झाली नाही.