भाषाविचार - प्रसारमाध्यमांचा प्रादेशिक भाषांबद्दलचा अनाग्रह (भाग -१७)


“प्रसारमाध्यमांमध्ये भाषा चुकली की एकेकाळी 'उपसंपादकाच्या डुलक्या' या सदराखाली टीका व्हायची. संपादकांपर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग उपलब्ध होते. इंटरनेटमुळे खरं तर हा संपर्क अधिक सोपा व्हायला पाहिजे; कारण बहुतेक वर्तमानपत्रांची संकेतस्थळं आहेत, ई-पेपर्स आहेत, फेसबुक आणि ट्विटर खाती आहेत. अनेक संपादकसुद्धा या नव्या माध्यमांवर उपलब्ध असतात. त्यामुळे प्रतिक्रिया वेगाने पोहोचणं शक्य असतं. मात्र असं असतानाही भाषेवर होणारे अत्याचार संपादकांना एकतर कळत नसावेत किंवा लोकांना काय वाटतंय यामुळे त्यांना फारसा फरक पडत नसावा.” मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक  डॉ. दीपक पवार ‘भाषाविचार’ या सदरातून प्रसारमाध्यमांच्या प्रादेशिक भाषांबद्दलच्या अनाग्रहाबद्दल सांगतायत -
गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या असं लक्षात येतंय की, वर्तमानपत्रांची आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांची भाषा वेगाने बदलली आहे. त्याची सुरुवात वाक्यांमधल्या इंग्रजी शब्दांच्या वाढत्या वापराने झाली. हळूहळू बातम्यांची शीर्षकं इंग्रजीत आली. पुरवण्यांची नावं इंग्रजीत आली.  वर्तमानपत्र खपवण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा टी.आर.पी. वाढवण्यासाठी खपणारे सगळे लोक टाय-बूटवाले आणि इंग्रजी फाडणारे झाले. म्हणजे पोट प्रादेशिक भाषांवर चाललेलं आहे, पण प्रत्यक्ष व्यवहारात मात्र इंग्रजीचाच वापर होतो आहे, असं प्रादेशिक भाषांमधल्या पत्रकारांचं झालं आहे. प्रादेशिक भाषांमधले पत्रकार आणि प्रादेशिक भाषांमधल्या शाळांतील शिक्षक यांची उपजीविका भाषेच्या वापरावर आणि वावरावर असल्यामुळे त्यांना आवडो अथवा न आवडो, पटो अथवा न पटो भाषा जगण्या-जगवण्यात त्यांचा स्वार्थ आहे.  त्यामुळे पत्रकारांवर दयाबुद्धी किंवा कनवाळूपणा म्हणून नव्हे, तर नैतिक आणि व्यावसायिक जबाबदारी म्हणून भाषांचं काम करण्याची जबाबदारी आहे. पण दुर्दैवाने बहुतेक पत्रकारांचा याबद्दलचा दृष्टिकोन हा असंवेदनशीलतेपासून सुरू होऊन अज्ञान आणि उर्मटपणाशी थांबतो.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


भाषा , पुस्तके , वाचन संस्कृती , दीपक पवार , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Hemant Marathe

      4 महिन्यांपूर्वी

    अगदी माझ्या मनातील विचार मांडले आहेत

  2. jyoti patwardhan

      4 महिन्यांपूर्वी

    अनेक वाचकांच्या मनातली खंत ह्या लेखात व्यक्त केली गेलीयवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen