“अळिंबीला भूछत्र किंवा भुईछत्री असंही नाव आहे. हेही नाव तिच्या आकाराचं द्योतकच म्हणता येईल. या शिवाय तिचं आणखी एक विनोदी म्हणता येईल असं नाव म्हणजे ‘आदित्याची छत्री’. आदित्य म्हणजे सूर्य, पण ही भूईलगत असणारी इवलीशी वनस्पती, जो सगळ्या सृष्टीला तापवतो त्या सूर्याचीच छत्री, म्हणजे केवढी ही अतिशयोक्ती!” छप्पर - छत - छत्र - छत्री हा प्रवास मांडणारा साधना गोरे यांचा 'मराठी प्रथम'वरील लेख
...
आदिमकाळापासून ते आजच्या विज्ञानयुगापर्यंत अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा होत्या आणि आजही आहेत. ज्या क्रमाने त्यांचा प्राधान्यक्रम आहे, त्याच क्रमाने त्यांचा उच्चारणक्रमही ठरून गेल्यासारखा आहे. २०२०च्या मार्चमध्ये टाळेबंदी घोषित केली गेली आणि पुण्या-मुंबईसारख्या शहरांतून मूळ गावाकडे जाणारे लोकांचे लोंढे भर उन्हात वाट तुडवताना आपण पाहिले, त्याच्या बातम्या वाचल्या. हे वाट तुडवणं होतं पोटाच्या भुकेसाठी! आणि हे लोक दूर शहरांत आले तेही पोटाची खळगी भरण्यासाठीच! अन्न, वस्त्र या पहिल्या दोन गरजानंतर क्रमांक लागतो तो डोक्यावर छप्पर असण्याचा, म्हणजेच निवाऱ्याचा. काळ बदलला तसा माणसाच्या निवाऱ्याचं स्वरूप बदलत गेल्याचं आपण पाहतच आहोत. त्यानुसार ‘छप्पर’ या शब्दाला चिटकत गेलेले अर्थांचे विविध संदर्भ पाहणंही मजेशीर आहे.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शब्दवेध
, शब्द व्युत्पत्ती
, शब्दांशी मैत्री
, साधना गोरे
, मराठी अभ्यास केंद्र
Kuldeep Ghorpade
4 वर्षांपूर्वीछान माहिती
Yogesh Bhavsar
4 वर्षांपूर्वीछान माहिती आहे मँडम तुम्ही लिहिले आहे का
Vaishali Nake
4 वर्षांपूर्वीखुप छान
Geeta Manjrekar
4 वर्षांपूर्वीछानच माहिती !