भाषिक प्रदूषण


“हिंदी शब्दांच्या चुकीच्या वापराने तर अर्थाचा अनर्थ होतो. कारण, ते शब्द मराठीत वेगळ्याच अर्थाने प्रचलित असतात. काही उदाहरणे : ‘संपन्न’ -  नदीमुळे गावाचे जीवन संपन्न झाले, लताबाईंच्या गायनाने आमचे जीवन संपन्न झाले, हे मूळ अर्थ. पण आजकाल गल्लीबोळातला कुठलाही कार्यक्रम ‘संपन्न’ होतो! ‘सतर्क’ - पोलीस सतर्क राहिले आहेत, जनतेने सतर्क राहावे! पूर्वी सरळ ‘जनतेने सावध राहावे’ असे म्हटले जात असे, आणि ते पुरेसे अर्थप्रवाही होते.” सांगतायत लेखक शरद गोखले –
सध्या प्रदूषण हा जगातील शास्त्रज्ञांच्या व विचारवंतांच्या काळजीचा विषय बनला आहे. जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील अशा वातावरणातील अहितकारक बदलांना प्रदूषण म्हणतात. पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आपल्याला आधीच माहीत आहे. त्यात आता प्रकाश प्रदूषणाची भर पडली आहे. पाणी, हवा, ध्वनी, प्रकाश प्रदूषणे ही भौतिक प्रदूषणांची उदाहरणे झाली. पण अलीकडे अनेक पर्यावरणवादी या भौतिक प्रदूषणांएवढ्याच गंभीर व धोकादाय असलेल्या जैविक प्रदूषणाची चर्चा करू लागले आहेत. जैविक प्रदूषणाची व्याख्या त्यांनी अशी केली आहे. Biological pollution is the movement of living organisms, either accidentally or intentionally, from the place where they evolved to new environments where a lack of natural enemies permits their population to explode.  ते पुढे म्हणतात: Biological pollutants, like chemical pollutants, are here because of human activities. But unlike chemical pollutants, biological pollutants cannot be reduced or prevented by legislation. Once biological pollutants are imported, they grow, adapt, multiply and spread on their own unless direct, vigorous, and often costly actions are taken to stop them.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी भाषेचे प्रदूषण , मराठी भाषा , शरद गोखले , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Hemant Lagvankar

      3 वर्षांपूर्वी

    उत्तम लेख. अनेक शब्द केवळ व्यवहारात न वापरल्याने अडगळीत पडले आहेत; काही काळाने ते विस्मृतीत जातील. उदाहरणार्थ, 'विरंगुळा' हा शब्द सध्या ऐकायला येत नाही; 'टाईम पास' मात्र सर्रास कानावर पडतो. मराठी शब्द वापरले पाहिजेत, हे आग्रहाचे निवेदन.

  2. Sanjay Ratnaparkhi

      3 वर्षांपूर्वी

    शरद गोखले यांनी या लेखाद्वारे मराठी भाषेतील 'शब्द भेसळ' दाखवून दिली आहे. एकूणच भाषा शिक्षण आणि त्यातही मराठी भाषा हा विषय सत्तरच्या दशकांपासून लांब पडला आहे. भाषा आणि जगण्याचा संबंध आपण बांधू शकलो नाही, हे वास्तव नाकारता येत नाही. आपल्या जगण्यात भाषा आली पाहिजे हा आग्रह नाही. हा निकष अगदी इंग्रजी बाबतीतही आहे. संप्रेषणाला आपण भाषा समजत असल्याने, भाषाज्ञान उथळ राहते. शिक्षण व्यवस्था ही भाषा आग्रह धरत नाही, यातूनच बरेच काही लक्षात येईल. भाषा ही अधिक भेसळ झाल्याने विकसित पावते. परंतु परभाषिक शब्द आपल्या भाषेत सरावने याला काही काळ लागतो. उदाहरण म्हणून 'लाकूड' आणि 'लकडी' हे दोन शब्द सरळ भाषेची ओळख दाखवितात. मराठी लिहिताना,उच्चारताना मूळ मराठी शब्द पुढे आले पाहिजेत. आपण सतत हिंदी आणि इंग्रजी भाषेच्या प्रभावात राहून मराठी भाषा वापरत आहोत. आपली मराठी माध्यमे यात अधिक पुढचे पावले टाकत आहेत. यासाठी निश्चित अशी भूमिका हवी आहे. अशा भूमिकेची वाणवा असल्याने हे प्रश्न आहेत. डॉ. संजय रत्नपारखी



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen