भाषेचे राजकारण आणि प्रबंधलेखन (भाग १९)


“आज देशभरात कुठेही तुम्हांला संशोधनासाठी मोठा निधी हवा असेल, प्रकल्पवृत्ती हवी असेल; तर तुमचं संशोधन किंवा तत्सम लिखाण राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध व्हावं लागतं. त्यामुळे अभ्यासकांचं महत्त्वाचं लेखन इंग्रजी भाषेतून होतं. भारतीय भाषांमध्ये सहकारी अभ्यासकांनी मूल्यमापन केलेली (peer reviewed) नियतकालिकं एक तर नसतातच किंवा असली तरी खूप कमी असतात. इंग्रजीतल्या नियतकालिकांचा दर्जा संशयातीत असतो असं नाही; पण भारतीय भाषांमधल्या नियतकालिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोण अनेकदा सदोष असतो. त्यामुळे भारतीय भाषांमध्ये दर्जेदार लेखन केलं जात नाही.” मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार ‘भाषाविचार’ या सदरातून भाषा अभ्यासक म्हणून प्रबंधलेखन पद्धतीवर विचार मांडत आहेत -
‘जागतिकीकरणानंतरचे महाराष्ट्रातील भाषेचे राजकारण’ या विषयावर मी पीएच.डी.साठी  संशोधन केलं. खरं तर हा माझ्या विषयाच्या शीर्षकाचा अनुवाद आहे. विद्यापीठाला सादर केलेल्या माझ्या प्रबंधाचं  नाव Post Globalisation Politics Of Language in Maharashtra असं आहे. मी रुढार्थाने अभ्यासक असलेला माणूस नाही, मी कार्यकर्ता अभ्यासक आहे. त्यामुळे जशा काही स्वयंसेवी संस्था 'कोणत्या विषयावर निधी मिळतो' याचा विचार करून आपल्या आस्थेचे विषय बदलतात, तसे काही प्राध्यापक मंडळी 'कोणत्या विषयात पीएच.डी. लवकर मिळेल' याचा विचार करून विषय निवडतात. तसं मला करता आलं नाही आणि येत नाही. मी भाषेच्या चळवळीतला कार्यकर्ता होतो आणि आहे. त्यामुळे माझं संशोधन हे माझ्या कामाचा विस्तार आहे, असं मला तेव्हाही वाटलं होतं आणि आजही वाटतं. पण, तुम्ही कार्यकर्ते असाल तर तुमची एखाद्या विषयात गुंतवणूक असते; त्यामुळे तुम्ही त्या विषयाकडे तटस्थपणे पाहू शकालच असं नाही. त्यातही भाषेचा विषय अधिक संवेदनशील, त्यामुळे माझ्या मार्गदर्शिका(गाईड) मला सतत सांगत राहिल्या की, मी माझ्या संशोधन विषयाकडे तटस्थपणे पाहिलं पाहिजे. एका अर्थी त्यांचं म्हणणं योग्यच होतं; पण फक्त गुंतलो आहे म्हणून एखादा विषय बरोबर वाटतो असं नव्हे; तर काही वेळा एखादा विषय बरोबर वाटतो म्हणूनही आपण त्यात गुंततो. माझ्या संशोधन विषयाचंही तसंच झालं होतं. त्यामुळे संशोधन चालू असताना आपण मराठी भाषेबद्दल असलेलं हे संशोधन इंग्रजीतून का करावं, असा नैतिक पेच मला पडला. तो इतका तीव्र झाला की 'मी मराठीतून हे संशोधन करू इच्छितो' असं मी माझ्या गाईडना कळवलं.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्रबंधलेखन , मराठी भाषा , भाषाविचार , डॉ. दीपक पवार. मुंबई विद्यापीठ , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. sumitra jadhav

      3 वर्षांपूर्वी

    प्रादेशिक भाषांतील संशोधन लेखांद्वारे इंग्रजीत प्रकाशित व्हायला हवे हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. नियतकालिकांचे प्रकाशक अशी सुरुवात करू शकतील. शिवाय असे अनुवाद भारतीय भाषांमध्येही अधिक प्रमाणात होणे आवश्यक वाटते.

  2. Machhindra Borhade

      3 वर्षांपूर्वी

    खूप छान लेख. पीएच. डी. कोणत्या विषयात लवकर मिळेल हे पाहून तसे विषय निवडणारे त्या विषयाला खरं तर कितपत न्याय देत असतील हा मोठा प्रश्न आहे.

  3. Machhindra Borhade

      3 वर्षांपूर्वी

    खूप छान लेख. पीएच. डी. कोणत्या विषयात लवकर मिळेल हे पाहून तसे विषय निवडणारे त्या विषयाला खरं तर कितपत न्याय देत असतील हा मोठा प्रश्न आहे.

  4. Sanjay Ratnaparkhi

      3 वर्षांपूर्वी

    लेख छान आहे. यात कार्यकर्ता आणि अभ्यासक दोघेही येतात. विद्यापीठीय संशोधन आणि भाषा विकास यांचा संबंध असायला हवा. प्रबंध मराठी किंवा इंग्रजीतून असेल तर संबंधित भाषाही तेवढी प्रभावी दिसायला हवी. परंतु चित्र फार असमाधानकारक आहे. बहुतेक संशोधक हे आपल्याला भाषा येते, हे समजत असतात. प्रत्यक्ष लेखन करताना ते भाषेत अनुउत्तीर्ण असतात. द्विभाषिक विकास हा चांगला ठरू शकतो. उत्तम इंग्रजी वाचून उत्तम मराठीत व्यक्त करता येईल. तसेच उत्तम मराठी वाचून ते इंग्रजीत मांडले जावं. इंग्रजी येत नाही म्हणून मराठीचा आग्रह योग्य नाही. तसेच मराठीचा द्वेष म्हणून यातील चांगले संदर्भ इंग्रजीत न मांडणे,हा करंटेपणा होईल. एकूणच भाषा शिक्षण विकास नीट असेल, तर संशोधन दर्जेदार होईल.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen