शब्दांच्या पाऊलखुणा - कोलदांडा (भाग-२८)


ज्ञानेश्वरीमध्ये काठी या अर्थाने कोलतर दांडपट्टा या अर्थाने कोलकाठी हे शब्द आलेले आहेत. अंगकाठीचा निर्देश करणारे बारकुळाहाडकुळा या शब्दांमधील ‘कुळा’ हा शब्दही काठी याच अर्थाचा असून ‘कोल’चेच रूप असल्याचे कृ. पा. कुलकर्णींनी म्हटले आहे. दोन वेगवेगळ्या भाषेतील सारख्या अर्थाचे शब्द एकत्र येऊन मराठीत अनेक नवे शब्द तयार झाले आहेत.” त्यातील 'कोलदांडाया शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल माहिती देणारा  साधना गोरे यांचा 'मराठी प्रथम'वरील लेख.
नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ शोधू नये असं म्हणतात; कारण डोळ्यांत मावणार नाही एवढं विस्तीर्ण पात्र असणाऱ्या नदीचं मूळ अगदी इवल्याशा पाझरात असू शकतं किंवा ज्ञानी असणाऱ्या ऋषीचं कूळ एकदमच सामान्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदी आणि ऋषी यांच्याबद्दल आपल्या मनात असणाऱ्या भावनांना त्यांचे मूळ रूप जाणल्यामुळे तडा जाऊ शकतो, म्हणूनच त्यांच्याविषयी अशी म्हण प्रचलित झाली असावी. भाषेतल्या शब्दांचंही काहीसं नदी आणि ऋषी यांच्यासारखंच असतं. आपण गृहीत धरलेल्या उगमापेक्षा  शब्दांचं मूळ वेगळं असल्याचं कळल्यावर इथंही आपला अपेक्षाभंग होतो, मात्र त्यामुळे आपण दुखावत नाही. उलट त्यांच्या मूळ स्वरूपामुळे कधी आपण आश्चर्यचकित होतो, तर कधी हा शोध पहिल्यांदा आपल्यालाच उमगला आहे या आनंदाने हरखूनही जातो. प्रत्येकच भाषेत आपलं मूळ स्वरूप पार बदललेले असे कित्येक शब्द असतात. भाषा जितकी जुनी तितक्या त्यातील शब्दांच्या अर्थ-ध्वनी यांच्या परिवर्तनाच्या आवृत्त्या अधिक असण्याच्या शक्यता वाढत जातात. मराठीतील असाच एक शब्द म्हणजे ‘कोलदांडा’.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शब्दवेध , शब्द व्युत्पत्ती , शब्दांशी मैत्री , साधना गोरे , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Satish Rajgure

      3 वर्षांपूर्वी

    अतिशय सुरेख लेख.

  2. Nitin Chavan

      3 वर्षांपूर्वी

    अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण. नवीन माहिती मिळाली. धन्यवाद.

  3. Balvant Magdum

      3 वर्षांपूर्वी

    खूप छान माहिती मिळाली.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen