श्री. के. क्षीरसागर हे मराठी लेखक, विचारवंत, समीक्षक होते. ते टीकाकार म्हणून परिचित आहेत, तसेच ज्ञानकोशकार केतकरांचे समविचारी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. इंग्रजांच्या राजवटीत दिले जाणारे शालेय इंग्रजी शिक्षण स्वातंत्र्यानंतर मातृभाषेतून सुरू केल्यावर हा बदल समाजाने कसा स्वीकारला, तत्कालीन समाजाची मानसिकता काय होती, याविषयीचे विवेचन करणारा आणि सद्यःस्थितीतील इंग्रजीतील उच्च शिक्षण मराठीत सुरू करताना मार्गदर्शनपर ठरू शकेल असा लेख -
...
जी पिढी वयाच्या चौदाव्या वर्षी इंग्रजीतून संस्कृत शिकत असे, त्या पिढीतच माझा अंतर्भाव होतो. ‘रीडुप्लिकेशन’, ‘एओरिस्ट’, ‘इनिश्यल’, ‘कॉन्सोनंट्’, ‘टू व्हॉवेल्स’, ‘कोॲलीज’ इ. घशात काड्या अडकल्याप्रमाणे वाटणारे इंग्रजी शब्द आम्हाला संस्कृत व्याकरणाकरिता घोकावे लागत. वास्तविक इतके अवघड शब्द खुद्द इंग्रजीच्या व्याकरणातही भेटत नसत; पण अनेक भाषाकोविद, डॉ. भांडारकर यांनी संस्कृत व्याकरण तयार करताना इंग्रजीतून, ग्रीक, लॅटिन व्याकरणांतील संज्ञाही धुंडाळल्या असल्याने, संस्कृतचे व्याकरण इंग्रजीहूनही इंग्रजी बनले होते! पण, ‘सुखार्थिन: कुतो विद्या’ हे वचन आमच्या वाडवडिलांनी आमच्या कानात इतके दुमदुमविले होते की, कष्ट वाढले म्हणजे आम्हांला विद्याच वाढल्यासारखी वाटे! इंग्रजीचे आणि संस्कृतचे आम्ही मनोमन लग्न लावून दिले होते, जर इंग्रजीतून व्यक्त करता आले नाही, तर संस्कृत काव्याचा अर्थच कळला नाही, असे आम्हांला वाटे! अन् त्या दृष्टीनेच आजच्या जगन्नाथ शंकरशेट पटकावणाऱ्यांपेक्षाही त्या काळचे सामान्य विद्यार्थीही मला कधी-कधी अधिक विद्वान वाटतात.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मराठी माध्यम
, महाविद्यालयीन शिक्षण
, श्री. के. क्षीरसागर
, नवे शैक्षणिक धोरण
, मराठी अभ्यास केंद्र