भाषाविचार - इंग्रजी ही जगाची भाषा कशी झाली? (भाग २०)


"इंग्रजीचा जगभरात वाढता वापर होत असताना तिची रूपंही बदलली आहेत. त्यामुळे मूळच्या इंग्रजीच्या विशुद्ध रूपाला बाट लागला, अशी हळहळ व्यक्त करणारे विशुद्धतावादी आहेतच. तसे ते प्रत्येक भाषेतच असतात. पण एखाद्या भाषेचा पसारा जितका मोठा तितकी वादस्थळं जास्त. वेगवेगळ्या देशांमध्ये या भाषेतल्या शब्दांच्या उच्चारांत फरक पडतो. नवनवे शब्द वाढतात, त्यामुळे शब्दकोश नेमाने अद्ययावत करावे लागतात." मुंबई विद्यापीठातील राज्याशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार ‘भाषाविचार’ या सदरातून  सांगतायत इंग्रजी जागतिक भाषा होण्यामागची कारणे -
आज सगळं जग इंग्रजाळलंय, असं आपल्यातल्या बऱ्याच जणांना वाटतं; त्यामुळे कायमच अशी परिस्थिती होती किंवा राहील असं समजण्याचं कारण नाही. चार्ल्स बार्बर यांनी The English language - A Historical Introduction या नावाचं एक पुस्तक लिहिलंय. त्यात त्यांनी इंग्रजीचा हा विकास मांडला आहे. शेक्सपिअर हा इंग्रजीचा महाकवी; पण तो जेव्हा लिहीत होता, तेव्हा इंग्रजी बोलणाऱ्यांची संख्या अतिशय मर्यादित म्हणजे काही दशलक्ष लोकांपुरतीच होती. युरोपच्या इतर देशांमध्ये या भाषेबद्दल फार औत्सुक्य नव्हतं, मग जगाची तर बातच सोडा. आकड्यांनिशीच बोलायचं, तर सन १६०० मध्ये ५० लाख, औद्योगिक क्रांतीच्या भरभराटीच्या काळात म्हणजे सन १८५० मध्ये दीड कोटी, तर सन १९०० पर्यंत ३ कोटी, अशी इंग्रजी भाषकांची संख्या वाढली. इंग्रजी बोलणारे लोक जसजसे वसाहती करत इतर देशांमध्ये जाऊ लागले, तसतसा या भाषेचा प्रसार वाढला. अमेरिकन वसाहतींनी ब्रिटिश नियंत्रणापासून मुक्त होण्यासाठी लढा दिला. त्यानंतरच्या दोन शतकांत तिथे 'अमेरिकन इंग्लिश'चा प्रसार झाला, तर ब्रिटनच्या इतर वसाहतींमध्ये 'ब्रिटिश इंग्लिश'चा प्रसार झाला. गेल्या शतकभरात एकीकडे ब्रिटनचं वासाहतिक वर्चस्व संपलं, तर दुसरीकडे अमेरिकेचं आर्थिक, राजकीय वर्चस्व शतपटीने वाढलं. त्यामुळे इंग्रजीचा ओघ या प्रभावासोबत वाढतच गेला, असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इंग्रजी भाषा , मराठी अभ्यास केंद्र , भाषाविचार , डॉ. दीपक पवार

प्रतिक्रिया

  1. Sanjay Ratnaparkhi

      3 वर्षांपूर्वी

    डॉ. दिपक पवार यांनी इंग्रजी वाढीची उत्कृष्ट मांडणी केली आहे. इंग्रजी प्रमाणे मराठी भाषा आणि भाषिकांनी आपली भाषा वाढवली पाहिजे. याबाबत फक्त वायफळ चर्चा होत असते. ती बंद करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे हा उपाय आहे,जो नेहमीच लांब राहिला आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen