“बाईच्या सुसंस्कृतपणाशी जोडल्या गेलेल्या ‘काकण’ या शब्दाचे मूळ संस्कृतमधील ‘कंकण’ या शब्दात आहे. मनगटात घातल्या जाणाऱ्या या अलंकाराचा किणकिण असा आवाज येतो, त्यावरून किंकिङ् – किंकिणी – कङ्कण – काकण अशा क्रमाने मराठीत हा शब्द आल्याचं दिसतं.” काकण या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल माहिती देणारा साधना गोरे यांचा 'मराठी प्रथम'वरील लेख.
...
स्त्रियांचे पारंपरिक अलंकार वैज्ञानिकदृष्ट्या तिच्या आरोग्याला कसे हितकारक आहेत, हे धर्माभिमानी आणि संस्कृतिरक्षक विविध व्यासपीठांवरून सांगताना दिसतात. मात्र आधुनिक स्त्रीने अशा दागिन्यांशिवाय निरोगी आयुष्य जगून हा दावा तर फोल ठरवलाच, शिवाय त्यातील विज्ञानही कसं दिशाभूल करणारं आहे, याविषयीची मांडणीही वेळोवेळी केलेली आहे. उलट बांगड्या, जोडवी, पैंजण यांसारख्या सौभाग्यालंकारामुळे स्त्रियांच्या हालचालीवर बंधने तर येतातच; शिवाय या दागिन्यांचा आवाज तिचा वावर कुठे आहे, याचीही घरातल्यांना सतत वर्दी देतात, अशी स्त्रीवादाची कारणमीमांसा आहे. अर्थात, आधुनिक स्त्री अशा सौभाग्यलंकाराच्या बंधनातून हळूहळू मुक्त होताना दिसत असली तरी, काकणं किंवा बांगड्या हा आजही स्त्रीचा महत्त्वाचा सौभाग्यालंकार मानण्याकडे समाजाचा कल आहे.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शब्दवेध
, शब्द व्युत्पत्ती
, शब्दांशी मैत्री
, साधना गोरे
, मराठी अभ्यास केंद्र
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीहसत खेळत ज्ञानात भर पडली . खास लेख
Swati Madanwad
4 वर्षांपूर्वीछान लेख.
Umesh Pradhan
4 वर्षांपूर्वीस्त्री यांच्या विविध अलंकाराशी निगडित वाचायला आवडेल. स्त्रीवादी भूमिका अधिक स्पष्ट व्हावी.
Samidha Gandhi
4 वर्षांपूर्वीउचलबांगडी ची उकल पहिल्यांदाच कळली
Dr Gajanan Jadhav
4 वर्षांपूर्वीछान मांडणी.