“पोकळीला मानवाने दिलेला आकार म्हणजे एक अवकाश ठरत असतो. भारतीय संस्कृती प्रामुख्याने अवकाश निर्मितीशी, अवकाश पूजेशी संबंधित होती. कुठलीही नवी चांगली गोष्ट करायची झाली तर नवनिर्मितीसाठी असणारा अवकाश प्रथम ओळखावा लागतो. त्यावर औचित्य – सौंदर्य साधणाऱ्या पुनर्मांडणीचे संस्कार (डिझाइन स्ट्रॅटेजीचे संस्कार) करावे लागतात. राष्ट्र उभारणीच्या बाबतीतही ही गरज पूर्ण व्हावी लागेल. याचे भान भारतीय भाषांत आणि कलाक्षेत्रात कितीसे होते? म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी! मौखिक – लिखित भाषेचा विकास भारतात नृत्य-नाट्य-चित्र-प्रतीक भाषांच्या सोबतीने घडला. सर्व कलांचा विकास नादब्रह्माच्या सोबतीने झाला! आणि भाषा काय, कला काय आणि सभ्यता काय, सर्वांचे मूळ मानवी मनाच्या गाभाऱ्यावर माणसाचा संतुलन ताबा किती, यावरच अवलंबून असते.” सांगतायत लेखक रवी परांजपे -
...
‘सर्जनशील बुद्धिप्रामाण्यातून नवे ज्ञान-तंत्रज्ञान आणि सर्वांगीण विकास’ हा मानव जातीच्या प्रगतीचा मार्ग आजवर तरी बदलू शकलेला नाही. सदर प्रवासात अगदी हजारो वर्षांपूर्वीच्या मुळारंभापासून या ना त्या स्वरूपाची भाषा त्या शाश्वत मार्गाला सोबत करत आली आहे. खूप पुरातन काळी, जेव्हा मौखिक भाषा माणसापाशी नव्हती, तेव्हा तिचे स्वरूप नृत्य-नाट्य भाषेसारखेच असणार. एकमेकांशी होणारा संवाद हा स्पर्श, हात-वारे; इतर देहबोली आणि चेहऱ्यावरील भावदर्शनातून घडत असणार, हे उघड आहे. त्यातच पुढे केव्हातरी कंठध्वनीच्या चढउतारांनाही जागा लाभली असेल, तर आश्चर्य नको वाटावयास. या साऱ्या भाषासोबतीत कमी होती ती चित्रभाषेची. पण, त्यासाठी भारतात तरी भीमबेटका गुंफाचित्रांचा काळ यावा लागला.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .