भाषाविचार : समाजवाद्यांचा भाषाविचार (भाग २१)


“संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून गोवामुक्ती आंदोलनापर्यंत सर्व आंदोलनांमध्ये डावे आणि समाजवादी हिरिरीने सहभागी झाले, तेव्हा त्यांना भाषा आणि प्रादेशिकता यांचा संबंध कोतेपणाचा वाटला नाही. किंबहुना, तसा तो न वाटणं हीच त्यांच्या अस्तित्वाच्या दृष्टीने संजीवनी ठरली. पण, नंतर उजव्या शक्तींनी भाषा आणि प्रादेशिकता यांची आंदोलने ताब्यात घेतल्यावर प्रमाणाबाहेर सोवळेपणा बाळगणाऱ्या पुरोगामी शक्तींनी यातून अंग काढून घेतलं.” मुंबई विद्यापीठातील राज्याशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार  'मराठी प्रथम'वर समाजवाद्यांचा  भाषाविचार सांगतायत -
समाजवादी आणि डावे असे पुरोगाम्यांचे प्रामुख्याने दोन उपघटक भारतात दिसतात. समाजवाद्यांच्या अनंत चिरफळ्या उडालेल्या असल्यामुळे राज्यागणिक त्यांचे वेगवेगळे तुकडे दिसून येतात. त्या सगळ्यांचा एकमेकांशी आणि सगळ्यांचा मिळून समाजवादी विचारसरणीशी काही संबंध असतोच असं नाही. डाव्यांचे प्रामुख्याने भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी, लेनिनवादी, माओवादी असे महत्त्वाचे प्रकार पडतात. या सगळ्यांची मुळे औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात निर्माण झालेल्या विचारांमध्ये शोधता येतात. फेबियन समाजवादापासून इतर अनेक रूपांपर्यंत ही उत्क्रांती दिसून येते. मार्क्स आणि एंगल्स यांच्या कम्युनिस्ट पक्षाच्या जाहीरनाम्यापासून ते देशविदेशातल्या मार्क्सवादी विचारांपर्यंत अनेकांनी याबद्दलची मते मांडली आहेत. साधारणपणे डाव्यांमध्ये शोषक आणि शोषितांचा वर्ग यांचं समाजातलं अस्तित्व दोन्ही विचारधारा मान्य करतात. फरक आहे तो या संबंधांच्या आकलनामध्ये आणि त्यातून भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या व्यवस्थेमध्ये. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजवाद , डाव्यांचे धोरण , मराठी भाषा , भाषाविचार , डॉ. दीपक पवार. मुंबई विद्यापीठ , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Aviraj Marathe

      4 वर्षांपूर्वी

    लोकभावनेवर स्वार होण्यासाठी प्रतिगाम्यांनी जशी adoptions केली तशीच पुरोगाम्यांनीही करायला हवीत, अतिशय महत्वपुर्ण निरीक्षण मांडणारा लेख.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen