‘कलश’ म्हटलं की पाण्याने भरलेलं, ओल्या कुंकवाचं स्वास्तिक रेखलेलं पात्र, मुखाशी श्रीफळ, चहूबाजूंनी खोचलेली आंबा-नागवेलींची पानं, असं चित्र आपल्या डोळ्यांसमोर सहज उभं राहतं. धार्मिक कार्यातील या कलशाला आणि त्याच्या सोबतच्या या वस्तूंना हिंदू संस्कृतीतील तत्कालीन जीवनपद्धतींना अधोरेखित करणारा काहीएक प्रतीकात्मक अर्थ आहे. कलशाची व्युत्पत्ती आणि महत्त्व मांडणारा साधना गोरे यांचा ‘मराठी प्रथम’ वरील लेख-
...
१०६ मराठीप्रेमींनी आपल्या प्राणांची आहुती दिल्यानंतर १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याचा इतिहास आपल्या प्रत्येकालाच ठाऊक आहे. या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी मंगल कलशाची स्थापना करून नव्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. राज्याची स्थापना ही तशी सांविधानिक घटना असली तरी हिंदू धर्मात मंगल कलशाला एक धार्मिक महत्त्व आहे. त्यासंबंधी पुराणातली कथा असं सांगते की, देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून चौदा रत्ने प्राप्त झाली, त्यांपैकी एक रत्न म्हणजे अमृत. हे अमृत ठेवण्यासाठी विश्वकर्माने तयार केलेलं भांडं म्हणजे कलश! तर अशी ही मंगल कलशाची गोष्ट पुढे कळस, कळसा, कळशी यांनाही आपल्यात सामावून घेताना दिसते.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शब्दवेध
, शब्द व्युत्पत्ती
, शब्दांशी मैत्री
, साधना गोरे
, मराठी अभ्यास केंद्र
Dr Gajanan Jadhav
4 वर्षांपूर्वीछान माहिती