साहित्येतर व्यवहारक्षेत्रांत मराठीचा वापर


“आपापल्या भाषा सांभाळा, असे आवाहन युनेस्कोने जगातील भाषिक समूहांना यापूर्वीच केले आहे. भाषेचा ऱ्हास किंवा अंत हा सजीवांप्रमाणे तडकाफडकी किंवा अटळपणे होत नसला आणि त्यांना वाचवणे आपल्या हातात असले, तरी जगातील फारच थोड्या भाषा सुरक्षित आहेत असे दिसते.” भाषेचा ‘विकास’ आणि ‘ऱ्हास’ यांविषयीचा भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब यांचा चिकित्सक लेख
“युनिव्हर्सिटीत अमक्या एका परीक्षेस ज्ञानेश्वरी ठेवल्याने मराठी भाषेची वाढ होण्याची आशा बाळगणें व्यर्थ होय. या दिशेने खरा उपाय म्हटला म्हणजे सर्व अभ्यासक्रम मराठीत ठेवणें होय. ही गोष्ट शक्य नसली तरी इतर व्यवहार तरी होईल तितका आपल्या मातृभाषेत ठेवण्याचा प्रघात आम्हीं पाडला पाहिजें.”  - लोकमान्य टिळक
व्यक्तीच्या व समाजाच्या विकासात भाषेची भूमिका महत्त्वाची असते हे कोणालाही नाकारता येणार नाही. प्रगत समाजाची भाषा प्रगत असते किंवा प्रगत भाषा असलेला समाज प्रगत असतो असे म्हणता येते. एखाद्या समाजाचा विकास झालेला आहे, पण त्याच्या भाषेचा विकास झालेला नाही, असे चित्र आपणास सहसा दिसत नाही. राज्य मराठी विकास संस्थेचे घोषवाक्य आहे - ‘मराठीचा विकास, महाराष्ट्राचा विकास’. घोषवाक्य अर्थपूर्ण असले तरी आपली कृती मात्र विपरीत आहे. एखाद्या प्रदेशाचा विकास आणि प्रादेशिक भाषेचा विकास ही एकात्म व अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे. तशी ती असली पाहिजे. पण, जेव्हा त्यांच्या हितसंबंधांत द्वैतभाव किंवा विरोध निर्माण होतो, तेव्हा भाषेची प्रगती कुंठित होते, ती मागे पडते. मराठी भाषेशी जोडून घेऊन महाराष्ट्राचा विकास करण्याऐवजी मराठीला बगल देऊन वासाहतिक परंपरेने लाभलेल्या प्रगत इंग्रजी भाषेद्वारे तो करण्याचे अघोषित धोरण आपण प्रत्यक्षात अवलंबले आहे. जणू मराठी ही महाराष्ट्राच्या प्रगतीतील मोठा अडसर आहे. आपल्याला प्रगती करायची असेल तर इंग्रजीवाचून पर्याय नाही अशी लोकधारणाही बनत चालली आहे. अशा धोरणाने व धारणेने कदाचित महाराष्ट्राचा भौतिक विकास होईलही, पण तो मराठीचा भाषिक व सांस्कृतिक विकास असणार नाही. डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि अंगात फाटकी वस्त्रे हे कुसुमाग्रजांनी रेखाटलेले मराठीचे दारुण चित्र, ही ह्या इंग्रजीधार्जिण्या धोरणाची अपरिहार्य परिणती आहे. मराठी भाषकांचे हक्काचे राज्य स्थापन होऊन अर्धशतक लोटले, तरी साहित्येतर व्यवहारक्षेत्रांत मराठी भाषेचा विकास आपण अपेक्षेप्रमाणे करू शकलो नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी भाषा , व्यवहार भाषा , ज्ञान भाषा , राजभाषा , डॉ. प्रकाश परब , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Yogesh Bhavsar

      4 वर्षांपूर्वी

    छान माहिती आहे

  2. Yogesh Bhavsar

      4 वर्षांपूर्वी

    छान माहिती आहे

  3. Yogesh Bhavsar

      4 वर्षांपूर्वी

    छान माहिती आहे

  4. Yogesh Bhavsar

      4 वर्षांपूर्वी

    छान माहिती आहे

  5. Aparna Ranade

      4 वर्षांपूर्वी

    खुपच छान माहिती

  6. Aparna Ranade

      4 वर्षांपूर्वी

    खुपच छान माहिती



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen