मी भाषेच्या बिया पेरत निघालोय...!


भाषा जी आपण बोलतो, ऐकतो ती, इतकंच आपण जाणतो. पण यापलीकडेही भाषेची अनेक रूपे आहेत. निसर्गाच्या विविध रूपांत भाषा दडलेली आहे, समाजातील सामान्यांच्या विविध परिस्थितीत तीच भाषा हळुवार उजळत जाते. साहित्यिकांच्या भावभावनांच्या अलवार कोंदणात ही भाषा कधी आकुंचन तर कधी प्रसरण पावते. भाषेच्या या वेगळ्याच अंगाची ओळख करून देतायत ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०१२’ विजेते कवी, लेखक ऐश्वर्य पाटेकर –
कवीची किंवा लेखकाची साहित्यकृती हीच त्या कवीची वा लेखकाची भाषा असते. फार तर ती समजून घ्यायला आपण भाषाकोशाचा आधार घेऊ शकू, पण भाषाकोशाची ही मर्यादा ठरावी; अशी भाषा लेखक सतत घडवीत असतो किंवा असावा! लेखक ज्या परिवेशात जगलेला, वाढलेला असतो. त्या परिवेशाचा लेखकावर खूप मोठा परिणाम झालेला असतो. लेखकाच्या भरणपोषणाची जबाबदारीच परिवेशानं उचललेली असते. भुईवर पडलेलं शेण जसं माती घेऊन उठतं, तसंच काहीसं लेखकाच्या बाबतीत म्हणता येतं. लेखक जगतो तो परिसर, तिथला माणूस, त्याच्या भावभावना, त्याचे हर्षखेद, त्या साऱ्यांना लेखक अभिव्यक्त करत असतो. त्याने निर्माण केलेल्या प्रतिमा त्याच्या भोवतालानेच त्याला दिलेल्या असतात. अन् प्रतिमांच्या पोतावर साहित्यिकाची भाषा ठरत असते किंवा असावी. म्हणूनच की काय एक लेखक दुसऱ्या लेखकापासून वेगळा ठरत असतो. अन् त्यात भाषेचा फार मोठा वाटा असतो. मी ज्या प्रदेशात जगलोय, त्या प्रदेशाला अभिव्यक्त करण्याचा जिमा म्हणजे माझे काव्यलेखन. म्हणूनच मी माझ्या लिखाणाकडे छंद म्हणून बिलकूलही पाहू इच्छित नाही. माझं जगणं माझ्या पर्यावरणासकट व्यक्त करण्याची माझी धडपड असते. त्यात भाषेनं तिचा खूप मोठा हिस्सा सांभाळलेला असतो. मुळातून माझी धारणाच निर्मितीच्या बाबतीत स्पष्ट आहे. संवेदना, भावना आणि विचार या तिघांच्या एकत्रीकरणातून अनुभव उभा राहतो. अनुभवाला भाषा मुखरित करते. म्हणून भाषेच्या बाबतीत मी हमेशा दक्ष असतो. सतत तिच्या शोधात असतो. तो शोध एक-दोन दिवसांचा नाही. त्याला काळाची मर्यादाच नाही. दर दिवसाबरोबर तो उगवत असतो. मी भाषेच्या आसाभोवती फिरत असतो. जोपर्यंत मी लिखाणाची कृती करत राहीन, तोपर्यंत असंच चालत राहील.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


भाषा , ऐश्वर्य पाटेकर , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Chinmayee Sumeet

      3 वर्षांपूर्वी

    खरंच ऐश्वर्यसंपन्न करणारा लेख आहे हा.. किती तळमळ, आस्था आणि सुस्पष्ट, आरस्पानी विचार...



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen