शब्दांच्या पाऊलखुणा - फणी गेली केस उगवायला! (भाग – ३२)


“केस विंचरण्यासाठी फणीच्या दातांची ज्या प्रकारची रचना असते, तशीच काहीशी रचना केळीच्या घडातील केळींची असते.  त्या घडातील एकेका केळीच्या गुच्छाला म्हणूनच फणी म्हटलं जात असावं. शेतात पेरणीसाठी वापरल्या जाणाऱ्या तिफण या अवजाराची रचनाही अशीच असते. महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पिकाच्या तीन ओळी पेरण्यासाठी तिफणीचा उपयोग केला जातो. चौफणी, पाचफणी यांप्रमाणे कर्नाटक, तमिळनाडू या राज्यात बारा फणींचाही वापर केला जातो. केस विंचरण्याची फणी आणि या तिफणीतील साम्यही लक्षणीय आहे.” फणी आणि मराठी भाषेसंबंधीत गमतीजमती  मांडणारा साधना गोरे यांचा ‘मराठी प्रथम’ वरील लेख - 
हल्ली आपण घराबाहेर पडताना तयार होतो आणि काही खास कार्यक्रम असेल तर खास तयार होतो. थोडक्यात आपण नट्टापट्टा करतो किंवा सोप्या शब्दात सांगायचं तर मेकअप करतो. या तयार होण्याला किंवा नट्टापट्टा करण्याला पूर्वी मराठीत ‘वेणीफणी करणं’ म्हटलं जायचं. फणी किंवा कंगवा हे केस विंचरण्यासाठी वापरलं जाणारं साधन असलं, तरी फणीच्या विविध आकारांतल्या रूपांमुळे तिचा वापर तितक्याच विविध हेतूंसाठी केला जात असल्याचं दिसतं.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शब्दवेध , शब्द व्युत्पत्ती , शब्दांशी मैत्री , साधना गोरे , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Sudam Kumbhar

      3 वर्षांपूर्वी

    खूपच नवीन शब्द वाचायला मिळाले 👍🏻👍🏻 एक वेगळ्याच माहितीचा अप्रतिम लेख !!

  2. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    खूपच सुंदर !



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen