“जगात सुमारे सहा ते साडेसहा हजार भाषा अस्तित्वात आहेत आणि तत्त्वतः त्यापैकी प्रत्येक भाषेत ज्ञानभाषा होण्याची क्षमता आहे. ‘ज्ञानभाषा’ म्हणजे जी विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि विशेषतः उच्च शिक्षण, मूलभूत संशोधन, उद्योग, वाणिज्य, विधी व न्याय, प्रशासन आदी प्रगत व्यवहार क्षेत्रांत पूर्ण क्षमतेने व गुणवत्तापूर्ण रीतीने समाजाच्या सर्व घटकांकडून वापरली जाते, जी बुद्धिजीवी वर्ग आपापल्या क्षेत्रातील गंभीर स्वरूपाच्या तत्त्वचर्चेसाठी व विचारमंथनासाठी वापरतो, अशी भाषा.” मराठी ज्ञानभाषेविषयी वास्तवाची जाणीव करून देणारा भाषा-अभ्यासक डॉ. प्रकाश परब यांचा लेख -
...
मराठी ज्ञानभाषा व्हावी असा ठराव महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाने संयुक्त अधिवेशनात पारित केला, त्याला बरीच वर्षे झाली. ठराव पारित केल्यानंतर त्याच्या कार्यवाहीसाठी काही पावले उचलली जातील, अशी अपेक्षा होती. परंतु, त्या दृष्टीने कोणतीही हालचाल शासनस्तरावर ना झाली, ना होताना दिसत आहे. किंबहुना, असा काही ठराव आपण केला आहे, याचा विसरही एव्हाना पडला असेल. हे एक प्रकारचे स्वप्नरंजन होते, असे आता म्हणायला हरकत नाही.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मराठी भाषा
, व्यवहार भाषा
, ज्ञान भाषा
, राजभाषा
, डॉ. प्रकाश परब
, मराठी अभ्यास केंद्र
suchita sawant
4 वर्षांपूर्वीउत्तम लेख