‘पाकिस्तान’ हा शब्द जरी आपल्या नजरेस आला तरी राष्ट्रनिष्ठ म्हणणाऱ्या अनेक भारतीयांचं पित्त खवळतं. 'पाकिस्तानावर अजिबात विश्वास ठेवता कामा नये' इथपासून 'बॉम्ब टाकून पाकिस्तान उडवलं पाहिजे' असं म्हणणारे अनेक भारतीय आहेत. त्यांना त्यांच्या भारतीयत्वाचा जाज्ज्वल्य वैगरे अभिमान आहे; म्हणजे नेहमीच असतो. पाकिस्तानकडे घटनेने इस्लामी राष्ट्र म्हणून पाहण्याची त्यांना सवय लागली आहे. आज ज्याला आपण पाकिस्तान आणि बांग्लादेश म्हणतो, तो भाग १९४७ सालापूर्वी तत्कालीन ब्रिटिश शासनाच्या नियंत्रणाखालीच होता, हे आपल्या लक्षात येत नाही. या लेखात पाकिस्तानातल्या एका मोठ्या भाषाशास्त्रज्ञाच्या विचारांच्या मदतीने पाकिस्तानातल्या भाषिक प्रश्नांचा मागोवा घेतायत मुंबई विद्यापीठातील राज्याशास्त्राचे प्राध्यापक डॉ दीपक पवार -
...
महाराष्ट्रातल्या जागतिकिकरणानंतरच्या भाषेच्या राजकारणाबद्दल पीएच.डी.साठी संशोधन करत असताना, मला तारीख रहेमान या पाकिस्तानी भाषा शास्त्रज्ञांच्या पुस्तकांबद्दल कळलं. इंटरनेटने जग जवळ आलेलं असलं तरी एखाद्या लेखकापर्यंत किंवा विद्यापीठीय अभ्यासकापर्यंत पोहोचणं, आपल्या आणि इतर आशियायी देशांमध्ये नेहमीच सोपं असतं असं नाही, असा अनुभव मला या दरम्यान आला. भारतात आलेल्या काही पाकिस्तानी मंडळींकडून तारीख रहेमान यांच्यापर्यंत पोहोचणं थोडं सोप झालं. सर्वसाधारणपणे भाषा धोरण या विषयावर आपल्याकडे अधूनमधून लिहिलं जात असलं, तरी ‘भाषेचं राजकारण’ हा विद्यापीठीय वर्तुळांमध्ये फारसा लोकप्रिय विषय नाही. त्यामुळे या विषयावर आलेलं लेखन साप्ताहिक-पाक्षिकापुरतं दिसतं, पण बऱ्याचदा दुय्यम दर्जाचं म्हणून विद्यापीठीय विचारवंतांकडून नाकं मुरडली जातात. याचा अर्थ, भाषेच्या प्रश्नावर विद्यापीठीय विचारवंत अंग मोडून काम करतात असं नाही. उदाहरणार्थ, 'भारतातील भाषेचं राजकारण' या विषयावरचं संपादित पुस्तक २०१०च्या आसपास, म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ६३ वर्षानंतर प्रकाशित झालं, हे काही फारसं चांगलं लक्षण आहे, असं नाही.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मराठी भाषा
, भाषाविचार
, डॉ. दीपक पवार. मुंबई विद्यापीठ
, मराठी अभ्यास केंद्र
Abhinav Benodekar
4 वर्षांपूर्वीभाषावार प्रांत रचना होऊन भारतातले वाद वाढले हे कबूल करावे लागेल. कर्नाटकात कानडी सक्तीची केली की मराठीची गळचेपी, अन महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे अशा डरकळ्या -त्याही पोकळ कारण आपली मुलं इंग्रजी फाड -फाड बोलावीत म्हणून त्यांनाच धड मराठी येईना!तर पाकिस्तानात उर्दू मातृभाषेला डावलून थोपल्यामुळे तेथे वेगळे प्रश्न! एकूण वेगळा झाला तरी पाकिस्तान (बांगलादेश नाही!)अन भारत एक आहे!!
Sanjay Ratnaparkhi
4 वर्षांपूर्वीभाषा विषय हे शिक्षणात दुय्यम स्थानावर आहेत. हे आपल्या देशातील सद्यस्थितीत लक्षात येईल. त्यामुळे भाषा हा राजकीय क्षेत्रात दुर्लक्षित मुद्दा राहिला आहे. या संबंधीचे राजकीय मुद्दे, फारसे विचारात घेतले गेले नाहीत. डॉ. पवार यांचे म्हणणे रास्त आहे.