“अमेरिकेतल्या मराठी माणसांचे मराठीपण हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांपेक्षा वेगळे आहे. त्या वेगळेपणाचे संदर्भ शोधणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील घडामोडींचे ज्ञान असणे – भान असणे आणि महाराष्ट्रातल्या निवडणुका, तिथले मंत्री, राजकारण यांचा अमेरिकेतल्या मराठी मंडळांशी संबंध कितपत हवा? ह्या प्रश्नांची उत्तरे अधिवेशनाच्या संयोजकांनी शोधली पाहिजेत. केवळ ‘स्मरणगंध’ एवढाच या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मराठीपणाच्या शोधाचा केंद्रबिंदू नसावा. तसाच तो केवळ ‘महाराष्ट्र’ही नसावा. महाराष्ट्र-केंद्रितता, वर्गणीदार आणि प्रसादाच्या ‘सोवळ्या’तून बाहेर पडून या बृहन्महाराष्ट्र मंडळाचे मराठीपण आजूबाजूच्या भारतीय समाजासाठी खुले झाले पाहिजे. अमेरिकन महायात्रेत सद्भावाने मिसळून गेले पाहिजे.” अमेरिकास्थित मराठी जनांच्या मराठीपणाबद्दल सांगतायत लेखिका विद्या हर्डीकर-सप्रे.
...
‘अगं, हळू बोल... इथं आसपास पाच तरी लोक मराठी बोलणारे आहेत! तेव्हा या ट्रेन-स्टेशनवर मराठीत कोणाचा बाप काढायची सोय नाही!’ - ज्योत्स्ना मला सांगत होती. न्यू जर्सीतल्या पहाटे सहाच्या ‘कम्प्युटर ट्रेन’साठी कुडकुडणाऱ्या घोळक्यात खरंच पाच-सहा मराठी चेहरे दिसले!
‘अमेरिका हे मोठे भांडे असून त्यात जगातल्या संस्कृती एकत्र येऊन पडतात आणि वितळतात’, अशी अमेरिकेची एक प्रसिद्ध व्याख्या. तेव्हा एकविसाव्या शतकात न्यूयॉर्कला जाणाऱ्या आगगाडीत चार मराठी माणसं, ही काही विशेष आश्चर्याची गोष्ट नाही!
वीस वर्षांपूर्वी पुण्यातल्या आमच्या काही मित्रमंडळीची कल्पना होती की, ‘अमेरिका हा एक चौक आहे. मराठी लोक रोज एकमेकांशी गप्पा मारत त्या चौकात उभे असतात!’
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
अमेरिकेतील मराठी मंडळ
, बृहन्महाराष्ट्र मंडळ
, विद्या हर्डीकर - सप्रे
, मराठी समाज
, मराठी अभ्यास केंद्र
Machhindra Borhade
4 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख.