शब्दांच्या पाऊलखुणा - गुळाचा गणपती अन् गुळाचाच नैवेद्य (भाग-३३)


“‘नैवेद्य हा संस्कृत शब्द प्रमाण मराठीत जशाच्या तसा वापरला जात असला तरी ग्रामीण भागात त्याचं निवद असंही रूप होतं. नैवेद्य म्हणजे देवाचं जेवण, भोजन. घरातले लोक जेवायच्या आधी म्हणजे कुणी जेवण उष्टवायच्या आधी देवाला भोजन म्हणजे नैवेद्य दिला जातो. संस्कृतमधील नि आणि विद् या धातूंपासून मराठीत दोन रूपे तयार झालेली दिसतात. एक आहे निवेदणे हे क्रियापदरूप आणि दुसरं आहे निवेद्य. निवेद म्हणजे सांगणे, अर्पण करणे, बोलणे नैवेद्य या शब्दाची व्यूत्पत्ती सांगणारा  साधना गोरे यांचा ‘मराठी प्रथम’ वरील लेख-
संत नामदेवांच्या विठ्ठलभक्तीची त्यांच्या बालपणातली एक आख्यायिका सांगितली जाते. नामदेवांच्या विठ्ठलभक्त वडिलांचा एक नियम होता, ते दररोज पूजा करून विठ्ठलाला नैवेद्य दाखवत. एकदा वडील परगावी गेल्यावर ही कामगिरी नामदेवांवर आली. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे नामदेवांनी विठ्ठलाची पूजा तर केली, पण त्यांनी दिलेला नैवेद्य विठ्ठल काही केल्या खाईना. विनंती करून, रागावून देव ऐकत नाही, हे पाहून शेवटी निरागस नामदेव देवाला म्हणाले, ‘विठोबा, तू जर नैवेद्य खाणार नसशील, तर मी तुझ्या पायावर डोकं आपटून जीव देईन.’ आणि नामदेव डोके आपटणार तोच विठ्ठलाने लहानग्या नामदेवाला आवरलं आणि नैवेद्यही खाल्ला. गोष्ट इतक्या विस्ताराने सांगायचं कारण स्पष्ट आहे; आजचा लेख ‘नैवेद्या’विषयी आहे आणि ओघानेच देव नैवेद्य खात नाही, हे सत्य आपल्या विविध भाषाप्रयोगांतून कसं डोकावतं, या वास्तवाविषयीही आहे.

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शब्दवेध , शब्द व्युत्पत्ती , शब्दांशी मैत्री , साधना गोरे , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

 1. Purnanand Rajadhyakshya

    2 वर्षांपूर्वी

  छान माहितीपूर्ण लेख

 2. atmaram jagdale

    2 वर्षांपूर्वी

  खूपच छान . आवडला :

 3. Sanjay Ratnaparkhi

    2 वर्षांपूर्वी

  उत्तम माहिती.

 4. मंदार केळकर

    2 वर्षांपूर्वी

  उत्तम आणि माहितीपूर्ण लेख

 5. Yogesh Bhavsar

    2 वर्षांपूर्वी

  खुपच छान लेख आहेवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen