भाषाविचार : उर्दूबाबत अनास्था (भाग-२५)


स्वातंत्र्योत्तर भारतात धर्मनिरपेक्ष इहवादी भूमिका आणि धार्मिक किंवा जातीयवादी भूमिका यांत नेहमीच द्वंद्व निर्माण झालेलं दिसतं. भारताची फाळणी धर्माच्या आधारे झाली. भारत हा बहुसंख्याक हिंदू असलेल्या लोकांचा देश होईल, त्यामुळे त्यात अल्पसंख्याक मुसलमानांच्या हक्कांची पायमल्ली होईल, असं वाटल्यामुळे पाकिस्तानची मागणी झाली. त्यातून झालेल्या हिंसाचारामुळे धार्मिक क्षोभ कमी होण्याऐवजी वाढलेलाच दिसतो. मात्र याच क्षोभाची एक बाजू काहीशी दुर्लक्षित राहिलेली दिसते, ती म्हणजे या धार्मिकतेचं भाषाकारण. थोडं उलगडून सांगायचं तर, भारतात हिंदुत्वाची आणि पाकिस्तानमध्ये इस्लामची अभिव्यक्तीची भाषा कोणती आहे?” याबद्दल सांगतायत मुंबई विद्यापीठातील राज्याशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार-
पाकिस्तानच्या बाबतीत राज्यव्यवस्थेने इस्लामचा अधिकृत धर्म म्हणून स्वीकार करून आणि उर्दू ही इस्लामच्या अभिव्यक्तीची भाषा आहे, असं जाहीर करून हे काम सोपं करून ठेवलं आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपिता असलेल्या जिनांना उर्दू फारसं येत नव्हतं किंवा पारंपरिक  मुसलमानपणाच्या निकषावर ते अजिबात टिकू शकले नसते, हे आम जनतेला नसलं तरी अभ्यासकांना माहीत असलेलं सत्य आहे. त्यामुळे उर्दूचे इस्लामकेंद्री गोडवे गाताना पाकिस्तानातल्या मुसलमानांना देखील इतिहासाचं सोयीसोयीने पुनर्लेखन करावं लागतं. जर उर्दू ही आधीच्या पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानातली आणि सध्याच्या पाकिस्तानातली अभिव्यक्तीची, अस्मितेची आणि आकांक्षांची भाषा असेल, तर इतर प्रादेशिक भाषांचं काय करायचं, याचं उत्तर उर्दूच्या अभिमान्यांना देता आलेलं नाही. त्यामुळे उर्दू ही पंजाबी मातृभाषा असणाऱ्या पंजाबी मुसलमानांच्या सत्तेची भाषा झाली आहे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अभिव्यक्तीची भाषा , भाषाविचार , डॉ. दीपक पवार. मुंबई विद्यापीठ , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen