“परभाषेतील शिक्षण हा जगाच्या सांस्कृतिक विविधतेपुढील फार मोठा अडथळा आहे. स्वभाषा त्यागामुळे जर सांस्कृतिक विविधता संपुष्टात आली, तर ती पृथ्वीवरील सर्वांत मोठी सांस्कृतिक दुर्घटना असेल, असा इशारा डेव्हिड क्रिस्टल या भाषावैज्ञानिकाने देऊन ठेवला आहे. एखादी भाषा शिक्षणाची माध्यमभाषा असणे हे त्या भाषेच्या सुरक्षिततेचे लक्षण मानले जाते. माध्यमभाषा म्हणून मराठीला लागलेली ओहोटी ही मराठी भाषेच्या बाबतीतली प्रचंड चिंताजनक स्थिती आहे.” महाराष्ट्र राज्यात शिक्षणाचे माध्यम मराठीच का असायला हवे? याबद्दल सांगतायत मराठी अभ्यास केंद्राच्या उपाध्यक्ष डॉ. वीणा सानेकर –
...
शिक्षणाचे मराठी माध्यम: वास्तव आणि अपरिहार्यता
भारताने १९१९ नंतर खुले आर्थिक धोरण स्वीकारल्याचा फार मोठा फायदा समाजातील मध्यमवर्गाला झाला. पैशाचा ओघ जसजसा वाढत चालला, तसतसा हा वर्ग चंगळवादाच्या आहारी जाऊ लागला. गेल्या काही वर्षांत मध्यमवर्गीय कुटुंबातील एका घटकावर या बदलाचा सखोल परिणाम झाला. तो घटक म्हणजे कुटुंबातील वाढती मुले. मॉल संस्कृतीची सवय लागलेल्या उच्च मध्यमवर्गाने आपल्या मुलांसाठी एज्युकेशन मॉल्सची म्हणजे चकचकीत इंग्रजी शाळांची निवड केली. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न या वर्गाने प्रतिष्ठेच्या रिंगणात आणला आणि मराठी माध्यमातून मुलांना शिकवणे कमी प्रतिष्ठेचे आहे, अशी चुकीची व सोयीची धारणा करून घेतली. ज्या सुशिक्षित मध्यमवर्गीयांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मातृभाषा नाकारून इंग्रजीची निवड केली. त्यांची ही कृती आपल्या सांस्कृतिक मुळांपासून स्वतःला दूर नेणारी आणि पुढच्या पिढीलाही दूर जायला लावणारी आहे. ‘मागणी तसा पुरवठा’ हा जगाचा नियम आहे. इंग्रजी शाळांच्या वाढत्या मागणीनुसार गेल्या काही वर्षांत खासगी इंग्रजी शाळा आणि इंटरनॅशनल स्कूल्सचे अक्षरशः पेव फुटले आहे. मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीने इतक्या हुशारीने आपला कार्यभाग साधला की, आजही बहुतांश समाज आपल्या भाषेवर विश्वास ठेवायला तयार नाही.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
भाषा
, भाषाासंभ्रम
, मराठी माध्यम
, डॉ. वीणा सानेकर
, मराठी अभ्यास केंद्र