शब्दांच्या पाऊलखुणा - आंधळा डोळा काजळाने साजरा (भाग-३४)


"हिंदीचं अनुकरण करण्याच्या आधी मराठीत कार्यक्रमासाठी ‘साजरा झाला/केला’ असे शब्दप्रयोग सर्रास रूढ होते. या ‘साजरा’ची विविध शब्दप्रयोगांत गुंफलेली रूपं पाहणं मोठं गमतीचं आहे. ‘हासरा नाचरा जरासा लाजरासुंदर साजिरा श्रावण आला’ या कुसुमाग्रजांच्या कवितेतून किंवा ‘एक लाजरा अन् साजरा मुखडाचंद्रावानी खुलला गं’ या जगदीश खेबूडकरांच्या गीतातून ‘साजरा-लाजरा’ यांचा अनुप्रास मनात इतका घट्ट रुजलायकी एक उच्चारला की दुसरा शब्दही आठवतोच! साजरा शब्दाचा  - सुंदरदेखणा - या अर्थापर्यंत झालेला प्रवास पाहण्यासाठी आपल्याला ‘सज - साज – सजणे’ ही साखळी लक्षात घ्यावी लागते." संपन्न शब्दाचा मराठी-हिंदीतील अर्थत्याची व्युत्पत्तीतसेच 'सज-साज-सजणेयांविषयी 'शब्दांच्या पाऊलखुलाया सदरातून  सांगतायत साधना गोरे - 
वैशाखाच्या काहिलीत पावसाची आतुरतेने वाट पाहणारं मन भाद्रपदात ओल्या कापडांच्या कुबट वासाने गुदमरायला लागतं. हा पावसाळा सरतोय की नाही असं वाटत असतानाच कार्तिकाची सुखद हवा सुरू होते. हा बदल किंवा परिवर्तन निसर्गाचा स्थायीभाव आहे, तसा तो भाषेचाही आहे. प्रत्येक जिवंत भाषेत असे बदल सातत्याने होत असतात. मराठीत अशा अर्थबदलाची म्हणजे अर्थपरिवर्तनाची कितीतरी उदाहरणे सांगता येतील. अलीकडे मराठीतील ‘संपन्न’ शब्द हिंदीच्या अर्थाने वापरण्याकडे मराठी भाषकांचा कल वाढताना दिसतोय. काही वर्षांपूर्वी मराठीत सणांप्रमाणे वर्धापनदिन किंवा मराठी भाषा दिन यांसारखे कार्यक्रमही ‘साजरे’ केले जायचे. अलीकडे मात्र हिंदीप्रमाणे मराठीतही कार्यक्रम ‘संपन्न’ होऊ लागलेले आपण मोठ्या प्रमाणात ऐकतो, वाचतो आहोत. हा बदल किती मोठ्या प्रमाणात होतोय यासाठी गूगलची साक्ष घेता येईल. गूगलवर ‘संपन्न झाला’ हे शब्द टंकून शोध घेतल्यास एकदोन नव्हे, तब्बल दहा पानी परिणाम आढळून येतात. पैकी एखाददुसरा परिणामच हा मराठीतील ‘संपन्न’चा मूळ अर्थ दर्शवणारा आहे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शब्दवेध , शब्द व्युत्पत्ती , शब्दांशी मैत्री , साधना गोरे , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Sameer Vaidya

      3 वर्षांपूर्वी

    नितांत सुंदर लेख. लेख आवडला.

  2. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    खुपच छान

  3. Yogesh Bhavsar

      4 वर्षांपूर्वी

    लेख आवडला छान आहे



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen