भाषाविचार : ही तो चळवळ्याची जाती! - (भाग-२६)


चळवळी उभ्या करणं, त्या चालवणं हे लोकशाही शासनपद्धती स्वीकारलेल्या आपल्या भारत देशाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. चळवळीसाठी मनुष्यबळ कसं मिळवायचं, ते कसं टिकवायचं याचा आढावा घेता-घेता मराठीच्या चळवळीविषयी काही मूलभूत मुद्दे उपस्थित करणारा मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा लेख - 
कोणत्याही चळवळीला माणसं कशी मिळतात आणि गळती का लागते, हा थेट उत्तर देता येईल असा प्रश्न नाही. याचं कारण म्हणजे हे उत्तर अतिशय गुंतागुंतीचं बनलेलं आहे. माणसं चळवळीत का येतात? व्यक्तिगत आयुष्यातील अनेक सुखं नाकारून, कष्टसाध्य असं आयुष्य जगावं ही प्रेरणा त्यांना कुठून मिळते? हा जगभरातल्या सामाजिक चळवळींच्या अभ्यासकांमध्ये चिंतनाचा विषय आहे. सामाजिक चळवळी, राष्ट्रीय आंदोलनं, स्वयंसेवी कार्य, दारिद्र्य-अंताचा लढा, अशा विविध कारणांसाठी लोक आपलं घरदार सोडून किंवा रूढ परिभाषा वापरून बोलयचं, तर 'घरादारावर तुळशीपत्र ठेवून' कामात उतरतात, झोकून देतात. हे करत असताना दरवेळी त्यांनी इतरांचा आणि आपल्या सभोवतालच्या माणसांचा विचार केलेलाच असतो, असं नाही. काही वेळा असा अभ्यास करायला उसंत नसते, तर काही वेळेला अशा प्रकारचा विचार करणं म्हणजे स्वतःच स्वतःचे पाय मागे घेणं होतं. त्यामुळे सामाजिक कामाची झिंग चढलेला माणूस ते करण्यापासून कळत न कळत स्वतःला रोखत राहतो. याचा अर्थ, सामाजिक चळवळीत उतरणारी माणसं इतरांच्या बाबतीत असंवेदनशील असतात असा नाही; तर त्यांना जे तारे खुणावतात, त्यांचा वेध घेत ते पुढे जात राहतात. जे सोबत येतात ते येतात, जे मागे राहतात ते राहतात. हा विचार कार्यकर्त्याच्या बाजूने केलेला आहे असं दिसेल. मात्र दैनंदिन व्यवहारात जी सुखं सहज मिळणं शक्य आहे, त्यापासून दूर जाऊन जाणीवपूर्वक कष्टाचे जीवन पत्करणाऱ्यांना थोडा का होईना, पण संशयाचा फायदा दिला पाहिजे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्रबंधलेखन , मराठी भाषा , भाषाविचार , डॉ. दीपक पवार. मुंबई विद्यापीठ , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      5 आठवड्या पूर्वी

    ठिकवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen