शिक्षण क्षेत्रात मराठी-इंग्रजी द्विभाषा धोरणाची व्यवहार्यता (उत्तरार्ध)


“शिक्षणाच्या माध्यमभाषेचे धोरण ठरवताना आपल्यासमोर एकूण तीन पर्याय उपलब्ध आहेत, ते असे: (१) केवळ मराठी माध्यम (२) केवळ इंग्रजी माध्यम आणि (३) मराठीसह इंग्रजी किंवा इंग्रजीसह मराठी असे द्विभाषा माध्यम. पैकी पहिला पर्याय आता व्यवहार्य राहिलेला नाही. दुसरा पर्याय स्वीकारणे म्हणजे मराठीच्या मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे आहे. राहता राहिला तिसरा पर्याय द्विभाषिकतेचा. तो पर्याय आपणास स्वीकारता येईल काय आणि स्वीकारला तर ह्या द्विभाषिकतेचे स्वरूप काय असेल, हे ठरवावे लागेल.” – शिक्षणाचे माध्यम म्हणून द्विभाषा धोरणाची आवश्यकता अधोरेखित करणारा ज्येष्ठ भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब यांचा मराठी प्रथमवरील लेख...
देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतीय भाषांनी इंग्रजीची जागा घ्यावी व सर्व व्यवहारक्षेत्रांत त्यांचा वापर व्हावा, असे स्वप्न आपण पाहिले होते. मराठी भाषकांचे स्वतंत्र राज्य स्थापन झाल्यानंतर मराठी भाषेच्या संदर्भातही आपण हे स्वप्न पाहिले. पण, आपले भाषाधोरण कायम इंग्रजीधार्जिणे राहिले. भावनिक, सांस्कृतिक  पातळीवर आपण मराठीच्या बाजूने बोलत राहिलो, मात्र शिक्षणासारख्या महत्त्वाच्या व्यवहारात मराठीऐवजी इंग्रजीलाच प्राधान्य दिले. मराठीने इंग्रजीची जागा घेता-घेता आता इंग्रजीच मराठीची जागा घेईल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. साठ-सत्तरच्या दशकांत मराठी माध्यमाच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाचा विस्तार झाला खरा, पण मराठी व इंग्रजी ह्या भाषांचे सामाजिक, आर्थिक स्थान विषमच राहिले. काही अपरिहार्य कारणांमुळे शालेय शिक्षण मराठीतून व उच्च शिक्षण इंग्रजीतून ही आरंभी तात्पुरती म्हणून स्वीकारलेली व्यवस्था पुढे कायम राहिली. उच्च शिक्षणातही व्यावसायिक शिक्षण इंग्रजीतून आणि उदारमतवादी शिक्षण इंग्रजी व मराठीतून असे धोरण  स्वीकारले. त्यामुळे मराठी माध्यमातील शालेय शिक्षणाचा डोलारा आता कोसळू लागला आहे. उच्च शिक्षणातील मराठीचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. मराठी माध्यमातून व्यावसायिक पाठ्यक्रम उपलब्ध करून दिले, तरी ते यशस्वी होताना दिसत नाहीत, कारण एक तर त्यांकडे हुशार विद्यार्थी फिरकत नाहीत  व हे पाठ्यक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या बाजारात कोणी स्वीकारत नाही. एखाद्याने खूप मेहनत करून पैसे मिळवावेत, पण ते बाजारात चालू नयेत, असा मराठीच्या पदवीधरांचा अनुभव आहे. उद्योगाच्या आणि रोजगाराच्या जगात मराठी भाषेचे चलन चालत नाही. तिथे केवळ इंग्रजी भाषेतील ज्ञान व संभाषण कौशल्यच दखलपात्र आहे

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी भाषा , व्यवहार भाषा , ज्ञान भाषा , राजभाषा , डॉ. प्रकाश परब , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Sanjay Palkar

      7 महिन्यांपूर्वी

    समाजात मराठी भाषेच्या वापराच्या प्रेरणा नसणे हा खरा आजार हे व्यवस्थित अधोरेखित केले आहे. शिवाय मराठी सह इंग्रजी आणि इंग्रजीसह मराठी हे सुत्रही व्यवहार्य आहे परंतु . भाषिक धोरण आखताना मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे व्यवसायिक अभ्यासक्रम मात टप्प्या टप्या ने मराठीचा अंतर्भाव करावा.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen