शब्दांच्या पाऊलखुणा - उपवासाला केळं (भाग – ३७)


“केळी आणि कर्दळी यांच्या खुंटासंबंधात आणखी एक महत्त्वाचा संदर्भ आहे. केळीच्या मूळ झाडाभोवती आणखी रोपं फुटतातत्यांना केळीची पिल्लं म्हटलं जातं. काही ठिकाणी त्यांना केळीच्या लेकी असंही म्हटलं जातं, तर लेकींच्या रोपांना नाती म्हटलं जातं. कर्दळीलाही केळीप्रमाणे अशीच रोपं फुटतात. सृष्टीच्या प्रसवशक्तीचे रूप म्हणूनही केळीला धार्मिक कार्यात महत्त्व असावं. इतकं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असणाऱ्या केळीवरून म्हणी-वाक्प्रचारही पुष्कळ आहेत.” – ‘केळ’ या शब्दांची व्युत्पत्ती सांगणारा साधना गोरे यांचा लेख -
भारतातील बऱ्याच प्रदेशात बारा महिने उपलब्ध असलेले फळ म्हणजे केळ. हिंदू धर्मात पूजाअर्चा, सणसमारंभ, व्रतवैकल्ये अशा प्रसंगी केळ या फळाचं आणि पानाचं महत्त्व आहेच. शिवाय आपल्याकडील विवाहसोहळे आणि पूजाविधीलाही केळीचे खुंट लागतात. आधुनिक शास्त्रज्ञांच्या मते, या पिकाचे मूलस्थान आशिया खंडाच्या आग्नेय भागात  असून, ते भारतातील आसाम राज्याच्या दक्षिणेस आहे. अनादी काळापासून भारताच्या आग्नेय व पश्चिम भागांत ही वनस्पती आढळते. पुरातन संस्कृत ग्रंथांमध्ये केळ या फळाचा उल्लेख सापडतो.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शब्द व्युत्पत्ती , शब्दव्यवहार , साधना गोरे , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Viraj Londhe

      3 वर्षांपूर्वी

    लेख खरंच आवडला

  2. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    छान लेख . आवडला .

  3. Yogesh Bhavsar

      3 वर्षांपूर्वी

    लेख छान आहे

  4. Mrudula Karekar

      3 वर्षांपूर्वी

    मराठी प्रथम व बहुविध दोन्हीचे सभासदत्व वेगळे घ्यावे लागेल का



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen