“आपण सगळे कुठली ना कुठली भाषा रोज बोलतच असतो. त्यामुळे भाषा ही यत्र-तत्र-सर्वत्र असतेच, तिला काय होणार? अशी सर्वसाधारण समजूत असते. आणि काही होणार असलं तर त्यासाठी आवाज देण्याचा एकाधिकार आपण कधीचाच साहित्यिकांना देऊन ठेवला आहे. त्यांना त्यातलं सगळं कळतं, किंबहुना 'त्यांनाच त्यातलं सगळं कळतं' हे आपल्या मनात इतकं ठाम रुजलंय, की ते सांगतील ती पूर्व दिशा ठरते. त्यामुळे जास्त कविता लिहिल्या, कादंबऱ्या रचल्या किंवा सरकारने साहित्यिक पुरस्कारांची संख्या वाढवली, की भाषेचे प्रश्न आपोआप मार्गी लागतील असं साहित्यिक सांगतात आणि लोक त्यावर विश्वास ठेवतात.” – मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार भाषेसाठी काम करणाऱ्या लोकांविषयी सांगतायत -
...
काही दिवसांपूर्वी मी चेन्नई आणि जालंधरला गेलो होतो. तिथं समविचारी लोक भेटले. आपण करतोय तसंच काम करणारे लोक इतरत्रही आहेत, त्यांनाही आपल्यासारख्याच अडचणी आहेत, त्यांच्याकडेही कमी-अधिक प्रमाणात भांडण्याची ऊर्जा आहे, हे कळून बरं वाटलं. त्याहीपेक्षा महत्त्वाची आणि अस्वस्थ करणारी गोष्ट कळली, ती म्हणजे सगळीकडेच भाषेचं काम करणारी माणसं मोजकीच आहेत. म्हणजे विविध भाषा बोलणारे खूप लोक आहेत, पण त्या भाषेची काळजी वाहणारे मात्र मोजकेच आहेत. आता असा युक्तिवाद करता येईल की, कोणत्याही समाजात चळवळे लोक मोजकेच असणार. ती तर जगरहाटीच आहे. पण दिसतंय ते चित्र तितकं सोपं नाही.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
3 वर्षांपूर्वीअभ्यासपूर्ण लेख - छान आहे .