“जेव्हा एखाद्या समाजातील लोक स्वभाषा द्वितीय भाषा म्हणून आणि द्वितीय भाषा प्रथम भाषा म्हणून शिकायला सुरुवात करतात, तेव्हा तो त्या भाषेच्या अंताचा आरंभबिदू समजला जातो. शिक्षणाच्या ह्या अंदाधुंद इंग्रजीकरणाचा सामजाला काय फायदा झाला, याचाही एकदा जमाखर्च मांडला गेला पाहिजे. मूठभर वर्ग इंग्रजीत विज्ञान व तंत्रज्ञान शिकून परदेशी बक्कळ पैसा कमावू लागला म्हणजे प्रगती झाली का? गेल्या तीन-चार दशकांत संपूर्ण जगाने नोंद घ्यावी अशी काय ज्ञाननिर्मिती आपण केवळ इंग्रजी शिकून केली? राज्यातील एक तरी विद्यापीठ जागतिक क्रमवारीत पहिल्या शंभरात आले आहे काय?” – ज्येष्ठ भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब यांचे मराठी राज्यातील इंग्रजी शिक्षणावरील परखड भाष्य -
...
नुकताच राज्यभर ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा झाला. राज्यातील शैक्षणिक संस्थांनी हा पंधरवडा मोठ्या प्रमाणात साजरा केला, कारण राज्य शासनाने तशा सूचनाच दिल्या होत्या. मराठी भाषेच्या गौरवार्थ महाविद्यालयांनी व विद्यापीठांनी कसे व कोणकोणते कार्यक्रम करावेत, याबाबत मराठी भाषा विभागाकडून मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक पाठविण्यात आले होते. खरे तर दरवर्षीच शासन अशी परिपत्रके काढत असते. काही महाविद्यालये स्वयंस्फूर्तीने व कर्तव्यभावनेने मराठी भाषा पंधरवडा साजरा करतात, तर काही त्याकडे पाठ फिरवतात. यंदा शासकीय-निमशासकीय कार्यालयांनीही मोठ्या प्रमाणात मराठी भाषाविषयक कार्यक्रम आयोजित केले होते. कोविडमुळे बहुतेक कार्यक्रम आभासी पद्धतीने पार पडले. मराठी पंधरवडा साजरा करताना काही जण काव्यगायनात रमले, तर काही उत्सवी मनोरंजनात. चर्चा, व्याख्यानादी कार्यक्रमही पार पडले. पण या सर्वांचे फलित काय? बहुधा, फारसे काही नाही. भाषादिन, भाषा पंधरवडे साजरे करणे हा भाषासंवर्धनाचा खात्रीचा मार्ग नाही. ती आत्मसमाधानार्थ केलेली एक प्रतीकात्मक उपाययोजना आहे. भाषासंवर्धनासाठी लागणारी सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती आटली की समाज किंवा राज्यकर्ते अशा प्रतीकात्मक उपायांचा अवलंब करतात. एखाद्या समाजात असे दिन, पंधरवडे साजरे व्हायला लागले की समजावे, त्या समाजाने अन्य भाषेचा स्वीकार करून स्वभाषेला निरोप द्यायचे ठरवले आहे. मराठी भाषेबाबत असेच घडत असेल का?
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मराठी भाषा
, मराठी राज्य
, डॉ. प्रकाश परब
, मराठी अभ्यास केंद्र
Vanashri Phalake
4 वर्षांपूर्वीवास्तवावर भाष्य करणारी अत्यंत बोलकी प्रतिक्रिया