दृक्-श्राव्य माध्यमातील भाषा


दूरचित्रवाणी माध्यमाबाबत एक तक्रार सतत कानावर पडते; ती म्हणजे, या माध्यमांनी भाषेचे जतन करणे तर सोडाच, पण एकूणच मराठी भाषेला आपल्या व्यवहारात गौण स्थान दिले आहे. भाषेची मोडतोड, शुद्धलेखनाच्या चुका, चुकीचे उच्चारण आणि कार्यक्रमाच्या संपूर्ण संहितेत मराठीपणाचा अभाव, या यातील काही प्रमुख बाबी. या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मालिका लेखकांना आणि दिग्दर्शकांना कथासूत्र आणि त्याचे पडद्यावरचे सादरीकरण यातच रस असतो. रोज चालणाऱ्या मालिकांच्या लेखकांना तर वन लाइनर पुरेसा असतो.” – दृक्-श्राव्य माध्यमातील भाषेची चिकित्सा करणारा डॉ. केशव साठ्ये यांचा लेख -
एका लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीवर बातम्या बघत होतो. निवेदक ‘लांगूलचालन’ या शब्दाऐवजी ‘लांगूनचालन’ म्हणत होता. एका कार्यक्रमात निवेदक शिरवाडकरांचे ‘नटसम्राट’ हे नाटक कादंबरी आहे, असे आत्मविश्वासपूर्वक सांगत होता. एका चर्चात्मक कार्यक्रमात सूत्रसंचालक वक्त्याची ओखळ ‘प्रथितयश’ ऐवजी ‘प्रतिथयश’ लेखक म्हणून करून देत होता. विशेष म्हणजे, ही वाहिनी आजही लोकप्रियतेच्या निकषावर आघाडीवर असलेली वाहिनी आहे. अर्थात, अशा चुका वारंवार बहुतांशी वाहिन्यांवर पाहायला मिळतात. हे पाहताना मला या शुद्धलेखनाच्या संदर्भात पुण्यात एक अभिनव प्रयोग केल्याची आठवण येत होती.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


दृकृ-श्राव्य माध्यम , प्रसारमाध्यमे , डॉ. केशव साठ्ये , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    खुपच छान लेख आहे . उपयुक्त वाटला .

  2.   3 वर्षांपूर्वी

    असं काय लिहिताय राव.. मनोरंजन वाहिन्या आणि वृत्तवाहिन्या यांची एक स्वतंत्र मराठी भाषा आहे.. अमेरिकेत म्हणतात ना, We speak American. त्यांची स्पेलिंग्स, त्यांचे उच्चार ब्रिटीश इंग्रजीपेक्षा वेगळेच असतात. आपली मराठी चॅनेल्स (हा मराठी शब्द आहे बरं) अशीच एक वेगळीच मराठी बोलतात.. करूयात, बघुयात.. असं काहीतरी म्हणतात..जंता (जनता), अप्मान असे काहीतरी वेगळेच उच्चार करतात.. मालिकांमध्ये तर कहर करतात.. त्याविषयी न बोललेलं बरं.. वृत्तपत्रांची परिस्थिती फारशी वेगळी नाही. भाषा,विषय आणि एकंदरीतच सादरीकरण, हे मेंदूला न झेपणारे असल्याने मी गेल्या काही वर्षांपासून टीव्ही (हा देखील मराठी शब्दच) पाहाणे आणि वृत्तपत्रे वाचणे बंद केले आहे. त्यामुळे मन:शांती मिळते.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen